हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manoj Jarange Patil Mumbai Morcha । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आपल्या लाखो मराठा बांधवांसोबत मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईत धडकला असून सीएसएमटी परिसरासह संपूर्ण मुंबईत जिकडे बघेल तिकडे मराठा बांधव दिसत आहे. कोणी रस्त्यांवर खो खो खेळतंय, तर कोण रस्त्यावरच अंघोळ करत आहे. मराठयांनी अक्षरशः रस्ते जाम करून टाकलेत. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर मराठा आंदोलन बेकायदेशीर असल्याची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली. यावर आज तातडीने सुनावणी सुरु असून वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी कोर्टात सनसनाटी दावे केले आहेत. मराठा आंदोलकांना ठाकरे- पवारांची माणसे अन्नधान्य पुरवतात असा युक्तिवाद सदावर्ते यांनी कोर्टात केला.
यामागे राजकीय हस्तक्षेप- Manoj Jarange Patil Mumbai Morcha
न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणी वेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हंटल, सीएसएमटी हे संवेदनशील ठिकाण असून या परिसरात जनजीवन ठप्प झालं आहे, आंदोलक (Manoj Jarange Patil Mumbai Morcha) रेल्वे ट्रॅक वर उतरत आहेत, लोकांच्या गाड्या अडवत आहेत. वाहनधारकांना लायसन्स विचारत आहेत. एक दिव्यांग ५ तास वाहतूक कोंडीत अडकला होता असा युक्तिवाद गुणरत्ने सदावर्ते यांनी केला. आधीच गणेशोत्सवामुळे मुंबईत भार वाढलाय, त्यात आता तर आणखी काही लोक आंदोलनाला येतील असं चॅलेंज करण्यात येत आहे… यामागे राजकीय हस्तक्षेप आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे लोक आंदोलकांना अन्नधान्य पुरवतात असा आरोप सदावर्ते यांनी कोर्टात केला. तर राज्य सरकारने कोर्टात सांगितलं कि शनिवार आणि रविवारच्या आंदोलनाला आम्ही परवानगी दिली नव्हती, ते आंदोलन परवानगी शिवाय सुरु होत.
दुसरीकडे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनांत (Manoj Jarange Patil Mumbai Morcha) अटीशर्तीच्या झालेल्या उल्लंघनाची माहिती कोर्टात दिली. हमीपत्र देताना अटींचे पालन करू असं सांगितलं होत अशी माहिती महाधिवक्ता यांनी कोर्टात सांगितलं. ५००० लोकांना परवानगी दिली होती, मात्र त्यापेक्षा जास्त लोक आली. ध्वनिपेक्षकाचा वापर सुद्धा परवानगी शिवाय झाला. गणेशोत्सव सुरु असताना अनेक गाड्या रस्त्यावर रोखल्या जात आहेत. नियमांचे पालन करणे आवश्यक होते. खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ६ वाजेपर्यंत परवानगी होती, मात्र तरीही मराठा आंदोलकांनी ६ नंतर आझाद मैदान सोडलं नाही. मुंबई पोलिसांची निम्म्याहून जास्त पोलीस यंत्रणा हि आंदोलनातच व्यस्त आहे. यानंतर शाळा आणि कॉलेज बद्दल काय परिस्थिती काय असा सवाल कोर्टाकडून करण्यात आला, त्यावर उत्तर देताना उद्यापासून शाळा आणि कॉलेज सुरु होत आहेत अशी माहिती महाधिवक्त्यानी दिली.




