Manoj Jarange Patil Mumbai Morcha : उपोषण सुरु होताच 2 आमदार जरांगेच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?

Manoj Jarange Patil Mumbai Morcha
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manoj Jarange Patil Mumbai Morcha । मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटी गावातून मुंबईत पोचले आहेत. आझाद मैदानावर जरांगे पाटलांचं उपोषण सुरु असून कोणत्याही परिस्थितीत गुलाल अंगावर घेतल्याशिवाय इथून हलणार नाही, गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही अशी गर्जना मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. लाखोंचा समुदाय यावेळी जरांगे पाटील यांच्या सोबत असून संपूर्ण मुंबईत मराठ्यांचं वादळ बघायला मिळत आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून सुद्धा पाठिंबा मिळताना दिसतोय. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात करताच दोन आमदार त्यांच्या भेटीसाठी दाखल झालेत.

जे दोन आमदार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर गेले आहेत ते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.. एक आहे शरद पवार गटाचा तर दुसरा आहे अजित पवार गटाचा… शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर तर अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हे मनोज जरांगे पाटलांच्या स्टेजवर दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात या आमदारांनी आधीच जरांगे पाटलांना जाहीर पाठिंबा दिला आहे. संदीप क्षीरसागर यांनी जरांगे यांचं आंतरवली सराटी मधून निघाल्यानंतरच स्वागत केलं होते, तर प्रकाश सोळंके यांनी या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते. याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेतली. तिघांमध्ये आरक्षणाच्या दृष्टीने खलबते झाली.

मनोज जरांगे हे सर्व समाजासोबत आहे. ते जे करत आहेत ते योग्यच आहे. सरकारने ठाम निर्णय घेण्याची हीच वेळ आहे. विरोधीपक्षाचा आमदार म्हणून आम्ही निवेदन देणार आहोत. मनोजदादा जे आवाहन करतील आम्ही तसे करू. मनोजदादा ओबीसींवर अन्याय झाला तरीही रस्त्यावर उतरतात. महादेव मुंडे यांच्यासाठी सुध्दा ते मैदानात उतरले होते. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या भूमिकेला आपला जाहीर पाठिंबा असल्याचे संदीप क्षीरसागर यांनी म्हंटल. (Manoj Jarange Patil Mumbai Morcha)

कोणकोणत्या नेत्यांचा जरांगे पाटलांना जाहीर पाठिंबा –

ओमराजे निंबाळकर – खासदार, धाराशिव लोकसभा
कैलास पाटील – आमदार, धाराशिव-कळंब विधानसभा
संजय ऊर्फ बंडू जाधव – खासदार, परभणी लोकसभा
उत्तमराव जानकर, आमदार माळशिरस विधानसभा
बजरंग सोनवणे खासदार, बीड लोकसभा
नारायण आबा पाटील, आमदार करमाळा विधानसभा
संदीप क्षीरसागर आमदार, बीड विधानसभा
राजेश विटेकर – आमदार पाथरी विधानसभा
विजयसिंह पंडित – आमदार, गेवराई विधानसभा
प्रकाश सोळंके – आमदार, माजलगाव विधानसभा
राजू नवघरे – आमदार- वसमत विधानसभा
डॉक्टर बाबासाहेब देशमुख, आमदार सांगोला विधानसभा

जरांगे पाटील यांच्या मागण्या काय ? Manoj Jarange Patil Mumbai Morcha

1) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे
2) मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे
3) हैदराबाद गझेटियर लागू करा…तसेच सातारा, मुंबई गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
४) सगेसोयरे धोरणाची अंमलबजावणी करावी. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या पोट जात म्हणून घ्या.
५) मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी
६) मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.