हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला मुदत वाढवून दिल्यानंतर आणि आपले उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील आता मैदानात उतरले आहेत. येत्या 15 नोव्हेंबरपासून जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होणार आहे. हा दौरा 23 नोव्हेंबरला संपेल. या दौऱ्याच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाची थेट संवाद साधतील. त्यामुळे त्यांचा हा दौरा 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर कालावधीत 6 टप्प्यांमध्ये पार पडेल. तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरूवात जरांगे पाटील शाहू महाराजांच्या स्मारकपासून करतील. तर दौऱ्याचा शेवट शेवगावमध्ये होईल.
महाराष्ट्र दौरा कसा असेल?
15 नोव्हेंबर – वाशी, परांडा करमाळा
16 नोव्हेंबर – दौंड, मायनी
17 नोव्हेंबर – सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर आणि कराड
18 नोव्हेंबर – सातारा, वाई, रायगड
19 नोव्हेंबर – रायगड, पाचाड, महाड, मुळशी आळंदी
20 नोव्हेंबर – तुळापूर, पुणे, खराडी, चंदननगर, खालापूर, कल्याणा
21 नोव्हेंबर – ठाणे, पालघर, त्र्यंबकेश्वर
22 नोव्हेंबर – विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर
23 नोव्हेंबर – नेवासा, शेवगाव, बोधगाव
https://www.facebook.com/61552424012738/posts/pfbid0RxHW8ETB8g6jm2LTqEbVnRN5osaDhYWQWfjXEsXSt9zcTJAsDgds6franwVbceCUl/?app=fbl
अशा मार्गे मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा पार पडेल. मुख्य म्हणजे, जरांगे पाटील यांचा पुढचा दौरा विदर्भ, उर्वरित मराठवाडा, कोकण भागात होणार आहे. या दौऱ्याबाबत बोलताना जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की, या दौऱ्यामध्ये कोणाकडूनही पैसे घेतले जाणार नाही. जर कोणी मागितले तर देऊ नका. जर दिले असेल तर त्यांच्याकडून माघारी घ्या. ही सगळ्यांना सूचना आहे. जर आम्हाला माहीत झालं पैसे घेत आहे. तर समाज त्याला गैर करणार नाही, माफ करणार नाही. यामुळे आमच्या आंदोलनाला डाग लागणार नाही.