मनोज जरांगेची राज ठाकरेंवर टीका, म्हणाले AC मध्ये बसणाऱ्यांना….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचा (Maratha Aarakshan) मुद्दा अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली सुरु केली आहे. सर्वच नेते आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणत आहेत, मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मात्र महाराष्ट्रासारख्या राज्याला आरक्षणाची गरजच नाही असं मत मांडल्याने मराठा समाजातून राज ठाकरेंविषयी नाराजी पसरली. या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची झळ कळणार नाही असं म्हणत जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आरक्षणाची गरज राज ठाकरेंना नसेल, पण बाकीच्यांना आहे. राज ठाकरेंना जे वैभव मिळालं आहे ते ते मराठ्यांच्या जीवावर मिळाले आहे याचा विचार राज ठाकरेंनी करायला पाहिजे. . एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची झळ कळणार नाही पण गोरगरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे, त्यामुळे गोरगरिब जनतेच्या भावना जाणून घ्या . प्रत्येक वेळी तुमचेच विचार जनतेवर लादून चालत नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

महाराष्ट्रासारख्या राज्याला आरक्षणाची गरज नाही. शिक्षणापासून ते नोकऱ्यापर्यंत इतकं सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे. मात्र महाराष्ट्रात भूमिपुत्रांना नोकऱ्या, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. मग, तो ओबीसी असो किंवा मराठा. कुठल्याही जातीचा असो, महाराष्ट्रात मुला-मुलींना चांगलं शिक्षण, रोजगार मिळाला पाहिजे. यात जात येते कुठे? मला जातीतील काही कळत नाही. माझ्याकडे याचं उत्तर नाही. महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे आरक्षणाची गरजच नाही. महाराष्ट्रात किती शैक्षणिक संस्था आहे? तिथे आरक्षण आहे का?. नकिती जातींना मिळणार? किती नोकऱ्या उपलब्ध होणार? हे पण आपण तपासणार आहोत का? असा प्रश्न राज ठाकरेंनी केला. राज्यात सध्या सुरु असलेलं मराठा आणि ओबीसी राजकारण हे फक्त मतांच राजकारण आहे. प्रत्येक समाजाने ही गोष्ट समजून घ्यायला हवी. हे आपल्याला मूर्ख बनवतायत. याने हाताला काही लागणार नाही असं राज ठाकरेंनी म्हंटल. मराठा-ओबीसी हा वाद समाजात विष कालवण्याचा प्रकार आहे असा आरोपही राज ठाकरेंनी केला.