Manoj Jarange Patil : … तर मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनोज जरांगे पाटील प्लस बच्चू कडू प्लस प्रकाश आंबेडकर… महाराष्ट्राच्या राजकारणातील हे तीन मोहरे एकत्र आले तर येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळू शकतो…आघाडी आणि युतीच्या सोबत जाऊन राजकारणाचा छोटा वाटा पदरात पाडून घेण्यापेक्षा हे तिघेजण एकत्र आले तर नवं सत्ता समीकरण महाराष्ट्रात पाहायला मिळू शकतं… मनोज जरांगे पाटील, बच्चू कडू आणि प्रकाश आंबेडकर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पटलावर वजीर कसे बनतील? हे तीन गट एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करतील, इतपत ताकद त्यांच्याजवळ आहे का? जर असं झालं तर 2024 ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल? याच सगळ्याचं सविस्तर विश्लेषण पाहुयात

जरांगे + प्रहार + वंचित एकत्र येतील असं आम्ही म्हणतोय त्याचं पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे तिघांच्यातलं ट्युनिंग

आत्ताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं असेल तर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) , बच्चू कडू (Bachhu Kadu) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात एक समान धागा पाहायला मिळाला…तो म्हणजे स्वतंत्र राजकारणाचा…मनोज जरांगे पाटील यांनी बॅकेंडला राहून निकाल कसे फिरवले? हे आपल्याला माहित आहेच…पण दुसरीकडे प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडू यांनी स्वतंत्रपणे आपलं राजकारण टिकेल याची काळजी घेतली…कोणत्याही युती किंवा आघाडीला त्यांनी बांधून घेतलं नाही…अर्थात यामागचा प्लॅन होता तो विधानसभेचा…पक्ष फुटल्यामुळे विधानसभेला निवडून येण्यासाठी प्रहार, वंचित आणि जरांगे पाटलांना स्कोप आहे…म्हणूनच त्यांनी लोकसभेची तिलांजली दिली… पण यात मनोज जरांगे पाटील आणि वंचित यांच्यामध्ये ट्युनिंग पाहायला मिळालं… तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडून बच्चू कडूंनी जरांगे पाटलांना पाठिंबाच दिला आहे…त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील या तीन दबाव गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा निर्धार केला तर महाराष्ट्राला तिसरा पर्याय मिळू शकतो…जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणूक लढावी…. प्रहारच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत बच्चू कडू यांनी कुठल्याही आघाडी सोबत न जाता वीस जागा लढवण्याचा निर्धार केला आहे… तर दुसरीकडे मनोज जरांगेंनी विधानसभा लढवावी…त्यांच्या ६० ते ७० जागा आरामात निवडून येतील…असं बोलून बच्चू कडूंनी मनोज जरांगेंना सोबत घेण्याचा नवा डाव टाकलाय.. आता आंबेडकर आणि जरांगे पाटील यांच्यातील संवाद कायम असल्याने विधानसभेला ते एकत्र येतीलच…. त्यामुळे हे तीन चेहरे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात तिसरी आघाडी निर्माण करतील, याचे 100% चान्सेस आहेत…

तर Manoj Jarange Patil महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील | Prakash Ambedkar, VBA

जरांगे + प्रहार + वंचित एकत्र येण्यासाठी आणखीन एक कारण महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे विचारसरणी आणि युत्यांचा अनुभव

प्रकाश आंबेडकरांनी 2019 ला एमआयएम तर 2024 ला महाविकास आघाडी सोबत युती करण्याचा प्रयत्न केला… पण त्यांना आलेला अनुभव वाईट होता…हीच गोष्ट बच्चू कडूंसोबत घडली… महाविकास आघाडीत असताना बच्चू भाऊंचं सगळं ठीकठाक चाललं होतं…पण नंतर फडणवीसांनी शब्द दिल्याने त्यांनी शिंदे यांच्या बंडाळीला साथ दिली… पण नंतर महायुती सरकारमध्ये मंत्रीपद तर नाहीच पण सरकारने डायरेक्ट इग्नोर मारायला सुरुवात केली…यामुळे बच्चु भाऊंचा सेल्फ रिस्पेक्ट दुखावला… त्यामुळे बच्चू भाऊंनी लोकसभा स्वतंत्र लढवली… आणि नवनीत राणा म्हणजेच महायुतीची सीट पाडून दाखवलीच… त्यामुळे बच्चुभाऊंकडे पर्याय उरतो, तो महाविकास आघाडीचा… पण आता पुन्हा फिरून आहे तिथं जाणं हे कडूंना जड जावू शकतं… त्यांच्याकडे पर्याय उरतो.. तो जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकरांचा… या सगळ्यांचाच महाराष्ट्रातील युती आणि आघाडींचा अनुभव वाईट राहिलाय…अशा वेळेस स्वतंत्र राजकारण करतानाच दबाव गट तयार करायचा असेल तर हे तिघेजण एकमेकांना पोषक भूमिका नक्कीच घेऊ शकतात…सर्वात महत्त्वाचं म्हणजे आघाडी करण्यासाठी राजकारणात ज्या विचारसरणीचा सर्वात मोठा अडथळा ठरतो…तो मात्र या तिघांच्या बाबतीत राहत नाही…कारण बहुजन, वंचित यांच्या कल्याणासाठी राजकारण करणं…हा तिघांच्याही पॉलिटिक्सचा कोअर गाभा आहे… त्यामुळे विधानसभेला या तिघांची युती झाली ती नैसर्गिकच असेल…

जरांगे + प्रहार + वंचित एकत्र येऊन महाराष्ट्राची सत्ता हातात घेतील, इतकं त्यांचं खरंच वजन आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला लोकसभेचा निकाल पहावा लागेल…

2024 च्या लोकसभेला महाराष्ट्रात मनोज जरांगे फॅक्टर चालला…मराठ्यांच्या मुद्द्यावरून राजकारण पेटवणाऱ्या जरांगे पाटलांनी मराठवाड्यात भाजपाचा सुपडा साफ केला…त्याची आग विदर्भातही पसरली…विदर्भात भाजपचा नागपूरची जागा वगळता बाकीच्या सर्व जागांवर दारून पराभव झाला…पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यातही मनोज जरांगे फॅक्टर चालला…बजरंग बप्पा सोनवणे, डॉ. कल्याण काळे, बंडू जाधव यांसारख्या निवडून आलेल्या खासदारांनी मनोज जरांगे पाटलांमुळे आपला विजय झाल्याचं जवळपास मान्य केलंय…थोडक्यात काय तर मराठवाडा, विदर्भ आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यांची ताकद वापरून मनोज जरांगे पाटील येणाऱ्या विधानसभेलाही महाराष्ट्रात मोठी उलथापालथ घालू शकतात…दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांचा लोकसभेचा परफॉर्मन्स खराब राहिला असला, तरी त्याला कारण ठरलं ती त्यांची सततची बदलती भूमिका…पण असं असलं तरी वंचित कसा निकाल फिरवू शकते? हे आपण 2019 च्या लोकसभेला पाहिलं आहेच…त्यात अनेक अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघात वंचितची मोठी ताकद आहे…अकोला, सोलापूर, नागपूर, शिर्डी, धुळे यांसारख्या जिल्ह्यात वंचितला मानणारी मोठी व्होट बँक आहे… त्यामुळे लोकसभेला झालेल्या पराभवाची भरपाई प्रकाश आंबेडकर विधानसभेतून काढणार, हे तर कन्फर्म आहे… पण त्याचवेळेस जरांगे पाटील आणि बच्चू कडू एकत्र आल्यास नवीन सत्ता समीकरण आपण जन्माला घालू शकतो, असं कॉन्फिडन्सही आंबेडकरांना येईल…बच्चू कडू यांची प्रहारही महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात पोहोचलेला पक्ष आहे…अमरावती आणि आजूबाजूच्या मतदारसंघात तर प्रहारची जोरदार हवा आहे…सध्याच्या घडीला महाराष्ट्रात त्यांचे 2 आमदार असले तरी तब्बल 20 जागांवर आपण आरामात निवडून येऊ, असा आत्मविश्वास बच्चुभाऊंना आहे…त्यामुळे स्वतंत्र निवडणूक लढवून फक्त आमदार तयार करण्यापेक्षा महाराष्ट्राची सत्ताच आपल्या हातात येऊ शकते का? यासाठी हे नेते नक्कीच बैठकांच्या फेऱ्या सुरू करतील, यात शंका नाही….प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे पाटील, बच्चू कडू एकत्र आल्यावर खरच महाराष्ट्रात तिसरी आघाडी सत्तेत येईल का? जर असं झालं तर यांपैकी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर तुम्हाला कोणाला बघायला आवडेल? या सगळ्या विश्लेषणावर तुमचं मत, प्रतिक्रीया आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.