मानसी नाईक आणि प्रदीप खरेराच्या राजा-राणी संसाराला ४ महिने पूर्ण, सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘वाट बघतोय रिक्षावाला फेम मराठी अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच काही ना काही पोस्ट करत असते. पण बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत लग्न झाल्यानंतर तर ती सोशल मीडियावर त्याच्यासोबतचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करताना जास्तवेळा दिसतेय. पण यावेळी तिची पोस्ट थोडी खास आहे. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांच्या लग्नाला नुकतेच ४ महिने पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने मानसीने इंस्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचा फोटो शेअर करून तिचा पती प्रदीप खरेरा यावरील प्रेम व्यक्त केले आहे. सोबत त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CPBiuieAVsQ/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री मानसी नाईकने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर लग्नातील फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने लिहिले कि, चार महिने. ज्या दिवशी आपण भेटलो तो माझ्या आयुष्यातील दुसरा चांगला दिवस आहे. तर लग्न केले तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला दिवस आहे. हॅप्पी अॅनिव्हर्सरी डार्लिंग. आय लव्ह यू सो मच. मानसीच्या या पोस्टवर प्रदीप खरेराने देखील कमेंट केली आहे. तो म्हणाला, हॅप्पी अॅनिव्हर्सरी मेरी जान. मला तुझी खूप आठवण येतेय. तु जेवढा विचार करते त्याहूनही जास्त प्रेम मी तुझ्यावर करतो. मानसीच्या या पोस्टवर तिचे चाहते भरपूर लाइक्स आणि कमेंट्स करीत आहेत. मानसी आणि प्रदीप सोशल मीडियावर बऱ्याचवेळा एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात.

https://www.instagram.com/p/CO4vZXbgWx2/?utm_source=ig_web_copy_link

मानसी नाईकचा पती प्रदीप खरेरा हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्याचसोबत तो अभिनेता आणि मॉडेलदेखील आहे. प्रदीप त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे वेगवेगळे फोटो पोस्ट करत असतो. तो इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय दिसतो. त्याचे इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

https://www.instagram.com/p/CMOW5zbgNdR/?utm_source=ig_web_copy_link

तर मानसी नाईक एक उत्तम डान्सर आहे. तिने ढोलकीच्या तालावर, हॅलो बोला, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोमध्ये आपल्या नृत्याचे प्रदर्शन केले आहे. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयातुन रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे.

Leave a Comment