दो प्यार करनेवाले जंगल में… क्यो गये..?; अहोंसोबत मानसी नाईक पोहोचली जंगलात, जाणून घ्या कारण

0
132
Mansi Naik_Pradip Kharera
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे बऱ्याचदा ती शेअर करीत असलेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत येते. ती नेहमीच काही ना काही नवीन आपल्या चाहत्यांसाठी शेअर करीत असते. त्यात लग्न झाल्यानंतर मिसेस खरेरा बऱ्याचदा पतीसोबत सोशल मीडियावर झळकताना दिसतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. ते दोघेही चक्क जंगलात पोचले आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि, कश्याला? तर उत्तर आहे प्राणीप्रेम.

https://www.instagram.com/p/CPH-0Z9janB/?utm_source=ig_web_copy_link

मानसी नाईकने प्रदीप खरेरासोबत लग्न केल्यापासून ही जोडी खूपच चर्चेत असते. प्रदीप देखील आपल्या सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत काही ना काही शेअर करत असतो. नुकताच त्याने प्राण्यांसोबत खेळतानाचा आणि त्यांना फळ खायला घालताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या लॉकडाउनमुळे जंगलात असणाऱ्या प्राण्यांना खायला पुरेशा गोष्टी मिळत नाहीत. त्यामुळे प्राणीप्रेमी मानसी आणि प्रदीपची जोडी थेट जंगलात पोहोचली. त्यांनी प्राण्यांच्या खाण्याची सोय केली. प्रदीपने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. प्राण्यांना मदत करण्याची विनंतीदेखील यावेळी प्रदीपने केली आहे.

https://www.instagram.com/p/CLRP0A8Av3o/?utm_source=ig_web_copy_link

मानसी नाईकचा पती प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. तसेच तो एक अभिनेता आणि मॉडेल देखील आहे. तर मानसी नाईक एक उत्तम डान्सर आणि सुंदर अभिनेत्री देखील आहे. तिने ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत. तर एकता – एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने विविध भूमिका निभावल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here