Wednesday, February 1, 2023

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री ऍक्शन मोडमध्ये; राज्यांना दिल्या ‘या’ सूचना

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने कहर केला असून अनेक लोक मृत्युमुखी पडली आहेत. भारताला सुद्धा कोरोनाचा धोका आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी सलग तिसऱ्या दिवशी सर्व राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशी विडिओ कॉन्फेरेंस द्वारे बैठक घेतली आणि देशातील सर्व राज्यांना काही सूचना केल्या आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यांनी सतर्क राहिलं पाहिजे, तसेच केंद्राशी समन्वय साधून एकभावनेनं काम केलं पाहिजे असेही त्यांनी म्हंटल.

आज पार पडलेल्या बैठकीत मनसुख मांडविया यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आगामी सण आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन लक्षात घेऊन ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट आणि लसीकरण’ वर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. याशिवाय मास्क घालणे, हात स्वच्छ ठेवणे आणि सामाजिक अंतर राखणे, कोरोनाच्या चाचण्या वाढवणे यासारख्या कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

घाबरण्याची गरज नाही. आपल्याला साथीच्या रोग व्यवस्थापनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. कोविड-19 चा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सर्व सहकार्य करेल असेही करेल असेही मनसुख मांडवीया यांनी म्हंटल. राज्यानी त्यांच्या आरोग्य व्यवस्थेसंबंधित सर्व व्यवस्थापन करावं आणि आरोग्य व्यवस्थेला सतर्क करावे असेही निर्देश त्यांनी दिले.