धक्कादायक! मानवतमध्ये युवकाचा तिक्ष्ण हत्याराने निर्घृण खून करुन मृतदेह जाळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
मानवत तालुक्यातील ताडबोरगाव शिवारामध्ये युवकाचा निर्घृणपणे खून करुन मृतदेह जाळून टाकण्यात आल्याची खळबळजनक घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. आठवडाभरा पुर्वी झालेल्या खुनाचा तपास पूर्ण लागला असताना आणखी एक गुन्हा घडल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभं राहील आहे.

मानवत शहरातील तकीया मोहल्ला येथील रहिवासी वाहन चालक अख्तर जलील शाह (वय ३३ ) अस मृताचे नाव आहे. अख्तर बुधवार दि.५ फेब्रुवारी रोजी राञी घरच्यांना गाडीला भाडे असल्याचे सांगत घरातुन निघाला होता. त्या राञी उशीरापर्यत तो घरी आला नसल्याने घरच्या लोकांनी अख्तर ची शोधाशोध केली. शेवटी भाऊ तन्वीर जलील शाह यांनी मानवत पोलीस ठाण्यात अख्तर च्या हरवल्याची नोंद केली होती. शुक्रवार दि. ६ फेब्रुवारी शोध घेत असताना मृत अख्तर चालवत असलेले वाहन एम एच ३८ पी १०३५ हे राष्ट्रीय महामार्ग ६१ शेजारी ताडबोरगाव शिवारात आढळून आले. अधिक शोध घेतला असता सदरील वाहनापासुन एक किलोमीटर अंतरावर ताडबोरगाव शिवारातील पेट्रोल पंपाजवळ गट नंबर २९४ येथील कापसाच्या शेतात युवकाचा निर्घुन पणे खून करुन मृतदेह जाळून टाकल्याचे निदर्शनास आले.

घटनास्थळी मानवत पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी पवार यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी एकबोटे, पो.शि.शेख अलीम, समीर पठाण, होमगार्ड शेख मझहर यांनी यावेळी भेट दिली. श्वानपथक व फॉरेन्सिक पथकासह, पोलीसांनी घटनेचा पंचनामा केल्यावर शवविच्छेदन करण्यासाठी मानवत ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आला होता. यावेळी याठीकाणी तणावाची परिस्थिती पहायला मिळाली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment