हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. याद्वारे जगभरातील लोकं एकमेकांशी कनेक्ट राहत आहेत. सध्या WhatsApp आणि Telegram सारखे इन्स्टंट मेसेजिंग अॅप देखील खूपच लोकप्रिय आहेत. आता Telegram ने आपल्या युझर्सना चांगला अनुभव देण्यासाठी काही नवीन फीचर्स सुरु केले आहेत. या फीचर्सपैकी एक खास फीचर्स म्हणजे रिअल टाइम चॅट ट्रान्सलेशन. याशिवाय नेटवर्क युझेस,प्रोफाईल पिक्चर मेकर, इमोजी कॅटेगरी आणि ऑटो सेव्ह मीडिया यासारखे काही फिचर्स देखील या अॅपमध्ये जोडण्यात आले आहेत.
काही ताज्या अपडेटद्वारे Telegram मध्ये ट्रान्सलेशनची सुविधा देखील समाविष्ट करण्यात आली आहे. याद्वारे आता युझर्सना रिअल टाइममध्ये संपूर्ण चॅट्स, ग्रुप्स आणि चॅनेल ट्रान्सलेट करता येईल. एकदा हे फिचर ऑन झाले की ते आपोआपच संपूर्ण चॅट ट्रान्सलेट करेल.
मात्र हे रिअल-टाइम ट्रान्सलेशन फिचर फक्त प्रीमियम युझर्ससाठीच उपलब्ध असेल. म्हणजेच हे फीचर वापरण्यासाठी युझर्सना टेलिग्रामचे प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. हे सबस्क्रिप्शन खरेदी केल्यानंतर चॅट, ग्रुप चॅट किंवा चॅनल ओपन करावे लागेल. त्यानंतर पेजच्या वरच्या बाजूला ट्रान्सलेट बार आणि सर्च बार पाहावा लागेल. ज्यावर टॅप करून भाषा निवडावी लागेल.
यानंतर युझर्सला त्यांना ज्या भाषेमध्ये ट्रान्सलेशन करायचे आहे ती भाषा निवडावी लागेल. इथे युझर्सना शो ओरिजिनलचा पर्याय देखील मिळेल. याद्वारे युझर्सना चॅट्स मूळ भाषेमध्ये ट्रान्सलेट करता येतील.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://telegram.org/
हे पण वाचा :
Blue Economy म्हणजे काय ? याद्वारे पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सचे उत्पन्न कसे मिळू शकेल ते पहा
Bank FD : ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी !!! आता ‘या’ बँकांच्या FD वर मिळणार 8.80% व्याज
‘या’ LIC योजनेत दररोज 58 रुपयांची बचत करून मिळवा 8 लाख रुपये !!!
PM Kisan योजनेबाबत सरकारचे मोठे वक्तव्य, शेतकऱ्यांचे पैसे वाढवण्यावर सांगितले कि…
RBI Monetary Policy : आता एटीएममधून नोटांऐवजी बाहेर येणार नाणी ! ‘या’ 12 शहरांमध्ये सुरू होणार सेवा