समुद्र किनाऱ्यावर अडकलेल्या शार्कच्या मदतीसाठी पुढे आले अनेक हात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकी हेच बळ आहे असे आपण लहानपणापासून खूप वेळा वाचले होते. एखादी अडचण आली असेल तर एकीमुळे ती सोडवणे सोपे जाते, असे प्रत्येक गोष्टींत सांगण्यात आले. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक शार्क लाटांसोबत वाहून किनाऱ्यावर अडकला होता. शार्क स्वतःहून समुद्रात परत जाऊ शकत नव्हता. अशा परिस्थितीत अनेक लोकं या शार्कच्या मदतीसाठी पुढे आले. लोकांनी मिळून शार्कला पुन्हा समुद्रात सोडले.

IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी सोशल मीडिया साइट ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहताच व्हायरल झाला. यामध्ये एक शार्क समुद्राच्या किनाऱ्यावर अडकलेल्या अवस्थेत दिसला. लाटांसोबत तो किनाऱ्यावर आला होता. शार्क इतका मोठा होता की तो पाण्यात परत जाऊ शकत नव्हता. अशा परिस्थितीत अनेक लोकं या अडकलेल्या शार्कच्या मदतीसाठी पुढे आले.

लोकांनी समुद्रकिनारी अडकलेल्या शार्क माशांच्या जवळची वाळू काढण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी किनाऱ्यापासून थोडासा उतार केला आणि त्यांनी मिळून शार्कला परत पाण्यात ढकलले. यानंतर शार्क परत पाण्यात गेला आणि पोहू लागला. हे पाहून लोकं जल्लोष करू लागले. लोकांना हा व्हिडिओ खूप प्रेरणादायी वाटला. अनेक लोकांनी मिळून संकटात अडकलेल्या या शार्कचा जीव वाचवला.

हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केल्यानंतर हजारो वेळा पाहिला गेला आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंटही केल्या. एका व्यक्तीने लिहिले की, आवाजहीनांना मदत करून गुणवत्ता मिळवणाऱ्या लोकांचे आभार. त्याचबरोबर अनेकांनी यातून धडा घेत संकटात अडकलेल्या लोकांना मदत करण्याचे आवाहन केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुसंता नंदा तिच्या ट्विटर अकाउंटवर प्राण्यांचे मनोरंजक व्हिडिओ शेअर करत असते. या व्हिडिओंसाठीच लोक अधिकाऱ्याला फॉलो करतात.

Leave a Comment