आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी जवळ बाळगण्याची गरज नाही; फक्त करा ‘हे’ काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । वाहन चालवताना तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसी (रजिस्ट्रेशन कार्ड) जवळ न ठेवल्याबद्दल तुमचे चलन कापले जाते . कारण ही कागदपत्रे ड्रायव्हरकडे असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र आता ही सर्व कागदपत्रे सोबत ठेवण्याची गरज नाही. केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा-1989 मधील दुरुस्तीच्या आधारे जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, यापुढे ड्रायव्हिंग लायसन्स बुक किंवा आरसी (रजिस्ट्रेशन कार्ड) जवळ बाळगणे आवश्यक नाही. त्याऐवजी, तुम्ही हे डॉक्युमेंट्स mParivahan mobile app मध्ये स्टोअर करू शकता आणि गरज भासल्यास ते अधिकाऱ्यांसमोर मांडता येतील. हे 100% युझर्ससाठी स्वीकार्य, प्रमाणित आणि सोयीस्कर आहे.

mParivahan mobile app मध्ये तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स जोडण्यासाठीची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घ्या.

स्टेप 1: सर्वप्रथम, Google Play Store वरून mParivahan App डाउनलोड करा.

स्टेप 2: तुमचा मोबाईल नंबर वापरून साइन अप करा. तुम्हाला एक OTP मिळेल. एंटर करा आणि App वर रजिस्ट्रेशन करा.

स्टेप 3: आता, तुमच्याकडे दोन पर्याय आहेत – DL (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि RC (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट).

स्टेप 4: तुमचा DL नंबर एंटर करा.

स्टेप 5: व्हर्चुअल DL जनरेट करण्यासाठी, “Add to My Dashboard” वर क्लिक करा.

स्टेप 6: जन्मतारीख एंटर करा आणि तुमचा DL तुमच्या ‘डॅशबोर्ड’ वर जोडला जाईल

स्क्रीनच्या वरच्या बाजूला तुमचा व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन्स पाहण्यासाठी डॅशबोर्ड बटणावर क्लिक करा, एकदा तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर, तुमचे DL डिटेल्स आणि एक QR कोड दिसेल. हा कोड डॉक्युमेंट्सची सर्व आवश्यक माहिती स्कॅन करण्यासाठी आणि पुन्हा मिळवण्यासाठी अधिकारी वापरतात. तुम्ही App मध्ये तुमच्या वाहनांचे आरसी बुक डिटेल्स देखील जोडू शकता.

एकापेक्षा जास्त वाहने जोडता येतील
mParivahan app वर,एखादी व्यक्ती वापरत असलेली अनेक वाहने जोडू शकतो. उदाहरणार्थ, पत्नीने रजिस्ट्रेशन केलेले वाहन चालवणारा पती त्याच्या app वर वाहनाचे डिटेल्स देखील जोडू शकतो. त्याचप्रमाणे, ड्रायव्हिंग लायसन्सचे डिटेल्स एकापेक्षा मोबाइल डिव्हाइसेसमध्ये जोडले जाऊ शकतात.

Leave a Comment