हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चीनने वसाहतवादी वादग्रस्त भूमिकेमुळे भारताशी काही काळ तणावाचे संबंध होते. यानंतर, भारतीय नागरिकांनी चिनी वस्तू आणि चिनी ॲपवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर भारत सरकारने एकूण 60 वेगवेगळे चिनी ॲप बंद करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये टिक टॉक’चाही समावेश होता. अल्पावधीमध्येच टिक टॉक हे ॲप वापरकर्त्यांच्या पसंतीस उतरले. आणि भारतामध्ये मोठे वापर करते बनले. शासनाने यावर बंदी घातल्यानंतर बरेच काळ संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. पण अजूनही मोठ्या प्रमाणात भारतीय लोक टॉप वापरत असल्याची माहिती समोर आली आहे.
29 जून 2020 रोजी भारत सरकारने टिक टॉक वरती बंदी आणली. परंतु ‘सिमिलर ॲप’ या वेबसाइटने जरी केलेल्या आकडेवारीनुसार, मोठ्या प्रमाणत भारतीय लोक टिक टॉकचा वापर करत आहेत. सरकारने केलेली बंदी ही नवीन ॲप डाऊनलोड करण्यावर होती. पण जे लोक पहिल्यापासून ॲप वापरत आहेत त्यावर कुठलीही बंदी नाही. नवीन ॲप चोरून डाऊनलोड करता येऊ शकते. अशा पळवाटा वापरकरते वापरत आहेत.
नवीन ॲप डाऊनलोड करायचे असल्यास apk.in वरून कोणतेही बंदी असलेले ॲप डाउनलोड करता येऊ शकते. प्ले स्टोअरवरून ॲप डाऊनलोड करण्याची गरज नाही. तसेच vpn वापरूनही काही बंदी आणलेले ॲप वापरता येऊ शकत असल्याचेही निदर्शनात आले आहे. बंदी झाल्यानंतर बरेच वापरकर्ते फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरू लागले होते. पण या पळवाटा समजल्यानंतर अनेक भारतीय पुन्हा टिक टॉक वापरू लागले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’