जगभरात दहशत, हिंसा पसरवण्यात उच्चशिक्षितांचा सक्रीय सहभाग; पंतप्रधान मोदींना म्हणायचं तरी काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जगामध्ये दहशत, हिंसा घडवून आणणे यांमध्ये उच्चशिक्षित आणि व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रीय सहभाग वाढत चालला आहे, असे धक्कादायक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं आहे.  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

”जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणे तसेच हिंसा घडवून आणणे यांमध्ये उच्चशिक्षित आणि व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रीय सहभाग वाढत चालला आहे. मात्र, दुसरीकडे कोरोना संकटाच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णालयांमध्ये आणि प्रयोगशाळांमध्ये काम करत लोकांचा जीव वाचवण्यासाठी झटणारेही आहेत. तुम्ही कोणत्या विचारसरणीचा अवलंब करता हे महत्त्वाचे ठरते. विचार करताना सकारात्मक विचार करता की नकारात्मक यावर तुमचे काम कसे होईल हे ठरते. तुम्हाला दोन्ही पर्याय खुले असतात, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

देशामध्ये लागू होणारे नवीन शैक्षणिक धोरण हे भारताला आत्ननिर्भर बनवण्यासाठी उत्तम आहे. शिक्षणाबरोबरच आपली विचारसरणी कशी आहे हेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. तुमची विचारसरणी तुम्हाला एखाद्या समस्येचे निराकरण करणारे व्हायचं की समस्येचा भाग व्हायचे हे ठरवते, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.