पुणे | मराठा आरक्षण आंदोलकांच्या समन्वयकांशी आज छत्रपती उदयनराजेंनी संवाद साधला. मराठा आरक्षणाचा प्रश्न तीस वर्षातील सरकारांनी गांभीर्याने घेतला नाही म्हणून आज हा प्रश्न उद्रेक होऊन समोर आला आहे. मराठा समाज गरीब आहे हे सांगण्यासाठी किती पुराव्यांचे साधरीकरण करावे लागणार आहे. शहरी झोपडपट्ट्यात ४५ % लोक हे मराठा समाजाचे आहेत. आणखी किती मागासलेपण दाखवून द्यायचे असा सवाल उदयनराजेंनी विचारला आहे.
न्याय व्यवस्थे कडे बोटे दाखवत बसण्यापेक्षा आरक्षणाचा प्रश्न कायदेशीर मार्गे सोडवला असता तर न्यायालयाकडे बोट दाखवण्याची वेळच आली नसती. दोनच गोष्टी मुळे मराठा आरक्षण रोखले आहे. निर्णर्याची उदासीनता किंवा राजकारण या दोनच कारणाने आरक्षण रोखले गेले आहे असे उदयनराजे म्हणाले. मराठा समाजातील युवकांनी केलेल्या आत्महत्येचे आपल्याला वाईट वाटते. तरूणांनी आत्महत्या करू नये असे मी आव्हान करतो असे उदयनराजे म्हणाले.
९ ऑगस्ट रोजी होणारा महामोर्चा शांततेच्या मार्गाने काढावा. मराठा समाजाने समाजाचा अवमान होईल असे कृत्य करू नका असे आवाहन उदयनराजेंनी केले आहे. लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर उद्रेक सरकार ही थांबवू शकणार नाही असे भाकीत उदयनराजेनी केले आहे.