मराठा क्रांती मोर्चाने दिला सेना भाजपला पाठिंबा

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी |सकल मराठा क्रांती मोर्चाने राज्यात महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली असताना, नाशिकमध्ये मात्र या संघटनेत फूट पडली आहे. सकल मराठा क्रांती मोर्चात सहभागी असलेल्या सहा संघटनांनी नाशिकमध्ये सर्व सकल बहुजन मराठा संघटना या झेंड्याखाली एकत्रित येत नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, तर दिंडोरीत भाजपच्या डॉ. भारती पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सकल बहुजन मराठा संघटनांचे समन्वयक तुषार जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

नाशिकमधील संघटनांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षण मिळवण्यासह तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी महायुतीचे सरकार पुन्हा येणे आवश्यक असल्याचे सांगत, अखिल भारतीय युवक मराठा महासंघ, शिवसंग्राम संघटना, मावळा संघटना, संभाजी ब्रिगेड, छत्रपती शासन, पंचवटी शिवजन्मोत्सव समिती व इतर संघटनांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

या संघटनांनी एकत्रित बैठक घेऊन एकमताने दोन्ही उमेदवारांना युवकांनी पाठिंबा जाहीर केला आहे. सर्व सकल बहुजन मराठा संघटना नाशिक जिल्हा वतीने हे हेमंत गोडसे व डॉ भारती पवार यांना जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याचे पत्रकार परिषदेत तुषार जगताप यांनी सांगितले. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आतापर्यंत समाजाची फसवणूक झाल्याचे सांगत मराठा समाजाच्या विकासासाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचा दावा त्यांनी केला. या वेळी अमित जाधव, शरद तुंगार, स्वप्नील येवले, संदीप शितोळे, सचिन पवार उपस्थित होते.

 

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

लोकसभा निवडणुकीसंदर्भातील महत्वाच्या बातम्या

दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज होणार शेवट

पक्षांतर्गत बंडाळीमुळे भाजपचा हा मतदारसंघ ‘ डेंजर झोन ‘ मध्ये

म्हणून प्रकाश आंबेडकरांनी मायावतींवर टीका करणे टाळले

म्हणून प्रकाश आंबेडकरांनी मायावतींवर टीका करणे टाळले

साताऱ्यात दहशत अन् स्टाईल चालणार नाही ; आदित्य ठाकरेंचा

उदयनराजेंना टोलापिळदार मिशी न्हवे तर स्वकर्तृत्व हे पुरुषार्थाचं लक्षण – उदयनराजे भोसले