नवी दिल्ली | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात रान तापलेले असताना भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजप खासदारांची राजधानी दिल्लीत बैठक बोलावली असल्याचे समजत आहे. मराठा समाज लोकप्रतिनिधींच्या घरा समोर निदर्शने करत असल्याची बाब अमित शहांनी गांभीर्याने घेतली असून त्यावर तोडगा काढण्यासाठी आणि आगामी काळात या मुद्द्याला पकडून रणनीती आखण्यासाठी शहा यांनी बैठक बोलावल्याचे बोलले जाते आहे. दरम्यान मराठा आरक्षणाची हकीकत बोलून दाखवण्यासाठी आणि आपल्या वरिष्ठांना हकीकत कळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. आज सायंकाळी या संदर्भात महत्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
Home ताज्या बातम्या मुंबईची खलबत गेली दिल्लीला, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अमित शहा करणार खासदारां सोबत...