Maratha Protest Mumbai । मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण राज्यात चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषण करण्यात इशारा राज्य सरकारला दिला होता. नवीन वर्षात 20 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाचा मोर्चा धडकणार आहे. या मराठा मोर्चाचे स्वरूप कसं असेल? कोणकोणत्या जिल्ह्यातून हा मोर्चा जाणार आहे, याबाबत संपूर्ण माहिती मनोज जरांगे पाटील यांनी आज सांगितली. तसेच करोडोंच्या संख्येने मुंबईत जमा व्हा असे आवाहन सुद्धा जरांगे पाटील यांनी मराठा बांधवाना केलं आहे.
कसा असेल रूट – Maratha Protest Mumbai
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचा मोर्चा (Maratha Protest Mumbai) आंतरवाली सराटीमधून 20 जानेवारी सकाळी 9 वाजता पायी मुंबईकडे निघणार आहे. आंतरवाली सराटी येथून अहमदनगर- पुणे- मुंबई अशी ही पायी दिंडी जाणार आहे. हा मराठा मोर्चा जालना, शहागड, गेवराई (बीड), अहमदनगर, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, खराडी, शिवाजीनगर, पुणे,लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूरमार्गे आझाद मैदानावर धडकणार आहे. जसा जसा मोर्चा पुढे पुढे जाईल तस तस त्या त्या गावातील लोक सहभागी होत जातील. या संपूर्ण मराठा मोर्चाही एक PDF फाईल तयार करून ती सर्व कार्यकर्त्यां व्हॉट्सॅपवरून पाठवली जाईल असं जरांगे पाटील यांनी सांगितली.
या वस्तू सोबत घेऊन मोर्चात सहभागी व्हा –
मुंबई धडकणाऱ्या या मोर्चात (Maratha Protest Mumbai) सहभागी होत असताना दररोज आपल्याला ज्या वस्तू लागतात त्या सोबत घेऊन या. अर्धा क्विंटल ज्वारी, बाजरी, तांब्या, कपडे , चटई, गहू, तांदूळ सोबत घ्यावे. तसेच अंघोळीचा साबण, मोबाईल चार्जर, कपडे, दूध पावडर, सरपण, तवा, सर्वकाही सोबत घेऊन चला असे आवाहन सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी केलं. तसेच मोर्चा सुरु असताना कोणीही व्यसन करू नका, मोर्चाला गालबोट लागेल असं वागू नका. आपल्या मोर्चात कोण वेडंवाकडं शिरतंय का त्यावर लक्ष द्या असेही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवाना सांगितलं आहे.