हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maratha Protesters । मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना जोर का झटका दिला आहे. दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा. 2 दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर आणा तसेच जे आंदोलक बाहेरून मुंबईच्या दिशेने येत आहेत त्यांना मुंबईच्या वेशीवरच रोखा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईत धडकला असून संपूर्ण मुंबई पॅक झाली आहे. दक्षिण मुंबईत तर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून या एकूण सर्व पार्श्वभूमीवर मराठा आंदोलन बेकायदेशीर असल्याची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावर दुपारी तातडीने सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी हायकोर्टाने मराठा बांधवांवर ताशेरे ओढले.
न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणी वेळी कोर्टाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते आणि महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी मराठा आंदोलक मुंबईत कसा धुडघूस (Maratha Protesters) घालत आहेत ते कोर्टाला सांगितलं. आंदोलक (Manoj Jarange Patil Mumbai Morcha) रेल्वे ट्रॅक वर उतरत आहेत, लोकांच्या गाड्या अडवत आहेत. वाहनधारकांना लायसन्स विचारत आहेत असा आरोप सदावर्ते यांनी केला. यामागे राजकीय हस्तक्षेप आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे लोक आंदोलकांना अन्नधान्य पुरवतात असा दावा करत सदावर्ते यांनी खळबळ उडवून दिली. दुसरीकडे, महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनीही म्हंटल कि, नियमांचे पालन करणे आवश्यक होते, परंतु ते होताना दिसत नाही. ५००० लोकांना परवानगी दिली होती, मात्र त्यापेक्षा जास्त लोक आली.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ६ वाजेपर्यंत परवानगी होती, मात्र तरीही मराठा आंदोलकांनी ६ नंतर आझाद मैदान सोडलं नाही. मुंबई पोलिसांची निम्म्याहून जास्त पोलीस यंत्रणा हि आंदोलनातच व्यस्त आहे.
कोर्ट काय म्हणाले? Maratha Protesters
मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेलं आहे, आता कोणालाही मुंबईत येऊ देऊ नका, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. मुंबईत अजूनही बाहेरून आंदोलक लाखोंच्या संख्येने येत असतील तर अश्या सर्व आंदोलकांना (Maratha Protesters) मुंबईच्या वेशीवरच थांबवा. तसेच आझाद मैदानाव्यतिरिक्त आंदोलकांनी इतर ठिकाणी वावरु नयेत अशा सूचना कोर्टाने दिल्या. उद्या म्हणजेच मंगळवारी दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व आंदोलकांना हटवा, मुंबईतील ज्या ज्या ठिकाणी रस्ते अडवण्यात आले आहेत तेथून आंदोलकांना हटवा. मात्र दुसरीकडे आंदोलकांना मूलभूत गरजा मिळायला हव्यात असेही कोर्टाने म्हंटल.




