कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मराठा आरक्षण हा बिलकुल राज्याचा विषय नाही. 102 वी घटना दुरूस्ती झाल्यानंतर कुठल्या घटकाला मागास ठरावयाचे हे सर्व अधिकार केंद्र सरकारने स्वताः कडे ठेवलेले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टाने ही केंद्र सरकारचीच जबाबदारी आहे, असा निर्णय दिलेला असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
छ. संभाजीराजे सध्या राज्यभर दाैरे करत आहेत. त्यांनी नरेंद्र मोदींना भेटीची वेळ मागितली असताना ती मिळत नाही. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छ. संभाजीराजे यांनी नरेंद्र मोदींना भेटण्याची गरज नाही, कारण मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे. यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली आहे.
https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/767040667328975
घटनादुरूस्तीनंतर कोणत्या घटकाला मागास ठरवाण्याचा अधिकार केंद्राकडे आहे. तशा प्रकारचा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. केंद्र सरकारने त्याविरोधात याचिका दाखल केलेली आहे. याचिकेचा प्रश्न सुटल्यानंततर एकाद्या समाजाला मागास ठरावयची जबाबदारी केंद्र सरकारची आहे की नाही याचा निर्णय झाला पाहिजे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.