सातारा | ‘मराठा आरक्षणाचा निर्णय हे भाजप सरकरने टाकलेले धाडसी पाऊल आहे’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप सरकारचे अभिनंदन केले. सातारा येथे आयोजित विकासकामांच्या भुमिपुजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती.
‘मराठा आरक्षणाचा निर्णय मागेच मार्गी लागायला हवा होता. पण तो लागला नाही. मला एक माहित आहे की जर इच्छा शक्ती असेल तर काहीही करता येतं’ असं मत व्यक्त करत भोसले यांनी मागील सरकारवर निशाना साधला. तसेच ‘सध्याच्या भाजप सरकारकडे इच्छाशक्ती आहे आणि त्यामुळे प्रत्तेक ठिकाणी त्यांच्या कामाला वेग मिळतो.’ असे म्हणुन त्यानी भाजपची स्तुती केली.
दरम्यान भाजप सरकारच्या कामाची पावती त्यांना लोक नक्की देतील असा विश्वास देखील उदयनराजे यांनी यावेळी व्यक्त केला. उदयनराजेंनी भाजपची भरभरुन केलेली स्तुती एकून अनेकांच्या भुवया उंचावल्या असून यामुळे राजकीय गोटात उलट सुलट चर्चांना उधान आला आहे.
ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.