बुलढाणा | मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता आंदोलकांचे आत्महत्तेचे सत्र अजूनही सुरुच आहे. बुलढाणा जिल्ह्यात काल एका आंदोलकाने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नंदू भानुदास बोरसे असे मृत व्यक्तीचे नाव असून तो मातोळा तालुक्यातील उबाळखेड गावचा रहिवासी असल्याचे समजत आहे.
हाती आलेल्या माहीतीनुसार, बोरसे यांनी राहत्या घरी विष प्राषन केले. बोरसे यांनी विष घेतल्याचे समजताच गावातील नातेवाईकांनी त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विषाची मात्रा अधिक असल्याने रुग्ण वाचू शकला नाही असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. नंदू बोरसे याने आत्महत्या करण्यापुर्वी लिहलेल्या चिठ्ठीत मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली असून चिठठीच्या खाली त्याने स्वतःचे नाव लिहले आहे. माझ्या नवऱ्याचे बलिदान व्यर्थ घालवू नका मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी नंदू बोरसे यांच्या पत्नीने केली आहे.
मराठा आरक्षणाचे आंदोलन दिवसेंदिवस भडकत चालले आहे. तसेच राज्याच्या विविध ठिकाणी आंदोलक आत्महत्या करत आहे. राज्यभर सुरु असलेल्या आत्महेत्तेच्या सत्राची गांभिर्याने दखल घेण्याची गरज आहे. ठीक ठिकाणी होणाऱ्या आंदोलनाने जनजीवन ठप्प झाले आहे.