Monday, February 6, 2023

‘दो रुपया बहोत बडी चीज होती है बाबू.. ! अभिनेता अंकुर वाढवेच्या संघर्षाची आठवण; इंस्टाग्रामवर व्हिडीओ केला शेअर

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील थुकरटवाडीत मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारा अंकुर स्क्रीनमध्ये दिसल्याशिवाय कॉमेडीचा तडकाच बसत नाही. तसे या शोमधील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतोच. कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती मज्जा यामुळे चला हवा येऊ द्या हा शो अतिशय लोकप्रिय आहे. या शोमधील प्रत्येक कलाकार आपले दुःख लपवून इतरांना हसवण्याचा जबाबदारी अत्यंत चोख बजावत आहेत. मात्र काही आठवणी अश्या असतात त्या बोचणाऱ्या असल्या तरीही काळजाच्या अत्यंत जवळ असतात. अंकुर अशीच एक आठवण आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्याने आपल्या संघर्षाची झलक दाखवली आहे.

- Advertisement -

अंकुरने त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अंकुर पूर्वी भांड्यांवर नावं कोरून लिहियचा. या कामासाठी त्याला प्रत्येक भांड्यामागे दोन रुपये मिळायचे. मात्र यावेळी त्या २ रुपयांसाठी नव्हे तर त्याने त्याच्या बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने कित्येक वर्षांनी भांड्यावर नावं लिहिली आहे. त्याचाच हा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यासोबत लिहिले की, बहिणीचं लग्न आहे त्यानिमिताने परत मशीन आईने हातात दिली आणि जुने दिवस बेलोऱ्याचे आठवले… बेलोऱ्यात लगीन सराईत भांड्यावर नाव टाकायचे दोन रुपये घ्यायचो… अक्षर चांगलं म्हणून लोकं यायचे. दिवसाला १०० रुपये कमवायचो… आज बायकोने एक कप चहा दिला…

अभिनेता अंकुर वाढवे हा उत्तम अभिनेत्यासोबत एक उत्तम कवीदेखील आहे. त्याच्या ‘पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी’ या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले होते. त्याने करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस, आम्ही सारे फर्स्ट क्लास, सायलेन्स आणि कन्हैया या नाटकात काम केले आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी नकार पचवून त्याने मिळतील त्या लहान सहान सहाय्यक भूमिकांमध्ये काम केले. मात्र त्याला मोठा ब्रेक मिळाला तो चला हवा येऊद्याच्या निमित्तानेच. आज अंकुरला ओळखणारा त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या कलेला आणि त्याच्यातील या आत्मविश्वासाला आज वेगळी ओळख मिळाली आहे.