आता लशीवर नवीन चित्रपट येतोय म्हणे..ती सध्या कुठे मिळते?; अंकुश चौधरीची भन्नाट पोस्ट

Ankush Choudhari
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी सध्या चित्रीकरण बंद असल्यामुळे सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. त्यामुळे तो सतत काही ना काही पोस्ट करत असतो. नुकतीच त्याने एक अशी पोस्ट केलीये कि ती भयंकर चर्चेत आहे. या पोस्टमध्ये अंकुशने भारतातील लसीकरणाच्या सद्यपरिस्थितीवर बोट ठेवले आहे. देशात लसींचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे अनेक केंद्रांवर लसींसाठी नुसत्याच रांगा लागल्या आहेत. परिणामी ४५ वर्षावरील लोकांना दुस-या डोजसाठी प्रतीक्षा करावी लागतेय. तर १८ ते ४० वयोगटातील लोकांच्या लसीचा पत्ताच नाही. याच पार्श्वभूमीवर अंकुशने सरकारला जोर का झटका धीरेसे दिला आहे.

https://www.instagram.com/p/CO-JLbUMNeC/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेता अंकुश चौधरीने ‘आता लशीवर नवीन चित्रपट येतोय म्हणे…ती सध्या कुठे मिळते?,’ अशी भन्नाट आणि कमालीची पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट नेतकऱ्यांसाठी चांगलीच लक्षवेधक ठरली आहे. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा नुसता पाऊस पडतोय. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींनीही त्याच्या या पोस्टवर दिलखुलास प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘ज्याचा आहे वशीला, त्यानेच जावे लशीला,’ अशी मजेदार प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर अन्य नेटकऱ्यांनी अंकुशच्या पोस्टला दुजोरा देत, एक नंबर, बरोबर, सही अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/COS4P1kMUm-/?utm_source=ig_web_copy_link

याआधीही अंकुशची एक पोस्ट प्रचंड वायरल झाली होती. त्याने या पोस्टमध्ये मास्क घालण्याचे आवाहन केले होते पण जरा वेगळ्या आणि हटके अंदाजात. ‘तेरी मेरी यारी , अगोदर मास्क घालू, मग करू दुनियादारी,’ असे म्हणत त्याने आपल्या चाहत्यांना मास्क घालण्याचे आवाहन केले होते. विशेष म्हणजे हि पोस्ट फोटो स्वरूपात होती आणि यात दिग्या आणि श्रेयाच्या कार्टून इमेज होत्या. त्यामुळे त्याची हि पोस्ट सुद्धा प्रचंड वायरल झाली होती आणि तितकीच चर्चेत सुद्धा होती. अंकुश शेवटचा ‘धुरळा’ चित्रपटात दिसला होता. ज्यात त्याच्यासोबत सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ हे कलाकार होते. त्यानंतर तो ‘लकडाऊन’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी दिसणार आहे.