हॅलो महाराष्ट्र टीम | मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत गाजलेला चित्रपट म्हणजे ‘माहेरची साडी’ चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर (वय ७०) यांचे सोमवारी दुपारी चारच्या सुमारास मुंबईत निधन झाले. भाटकर यांनी मुंबईच्या एलिझाबेथ रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भाटकर हे मागील एका वर्षापासून कॅन्सरशी लढा देत होते. विशेष म्हणजे आज कर्करोग दिनी (४फेब्रुवारी) भाटकर यांना कॅन्सरने गाठले.
‘माहेरची साडी’ हा चित्रपट आजही महाराष्ट्रातील स्त्रियांचा जिव्हाळ्याचा सिनेमा म्हणून ओळखला जातो. चित्रपट बघताना, आजच्या काळातही डोळ्यातून अश्रू येतात. अशा चित्रपटात अभिनय करणारे भाटकर आता राहिले नाही.
‘कमांडर’ आणि ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्ये झळकलेले प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांचा गायक-संगीतकार वासूदेव भटकर यांच्या घरी ३ ऑगस्ट १९४९ मध्ये जन्म झाला. १९७७ मध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तीस वर्षांहून अधिक काळ ते अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. त्यांचा कामाचा उत्साह शेवटपर्यंत टिकला. काही वर्षांपूर्वीच ते ‘तू तिथे मी’ आणि ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेत दिसले होते.
इतर महत्वाचे –
लग्नानंतर लगेच रणवीरचा सिम्बा धमाका !!
रितेश देशमुख १० वर्ष जेनेलीयाला डेट करत होता, जाणून घ्या लव्हस्टोरी