अभिनेत्री अन्विता फलटणकरची थ्रो बॅक पोस्ट; बालपणीचा फोटो केला इंस्टावर शेअर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका अगदी अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील ओम आणि स्वीटूची केमिस्ट्री प्रेक्षकांना अत्यंत भावतेय. मालिकेतील नायिका स्वीटू म्हणजेच अवनी हि भूमिका साकारत असलेल्या अन्विता फलटणकरने आपल्या निरागस आणि सोज्वळ अभिनयाने प्रत्येकाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. असाच एक गोड, निरागस, निर्मळ आणि मायेची उब असणारा एक फोटो तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत ती चिमुकल्या वयात आईच्या हातात विसावलेली दिसत आहे. तिची हि थ्रो बॅक पोस्ट पाहून अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/COpPa3PJ12s/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री अन्विता फलटणकर हि सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अनेको अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सच्या सतत संपर्कात असते. ती नेहमीच आपले विविध फोटो आणि व्हिडीओ आपल्या चाहत्यांसह शेअर करत असते. तिचे हे फोटो आणि व्हिडीओ पाहून तिचे चाहतेही तिचे भरभरून कौतुक करतात.

https://www.instagram.com/p/COecR71pgHO/?utm_source=ig_web_copy_link

अन्विताने काही दिवसांपूर्वी तिच्या लहानपणीचा आईसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये चिमुकली अन्विता आपल्या आईच्या हातात विसावून टुकूर टुकूर पाहताना दिसतेय. चाहत्यांनी अन्विताच्या या क्युट फोटोवर मोठ्या संख्येने लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

https://www.instagram.com/p/CL5sbuFpj1U/?utm_source=ig_web_copy_link

तसे अन्विताच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट प्रोफाईलवर नजर टाकताच लक्षात येते कि खऱ्या आयुष्यातली स्वीटू खूपच भन्नाट आणि स्टायलिश आहे. अन्विताने चार वर्षांची असताना भरतनाट्यम या नृत्य प्रकारचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. ती एक उत्तम नर्तिका आहे.

https://www.instagram.com/p/CGEfj9apxN_/?utm_source=ig_web_copy_link

अन्विताने या मालिकेआधी मराठी चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास’मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका अन्वितानेच साकारली होती. यानंतर २०१९ साली आलेल्या ‘गर्ल्स’ या चित्रपटात अन्विताने ‘रुमी’ नामक भूमिका साकारली होती. तसेच ‘Why so गंभीर’ या नाटकातही तिने काम केले आहे. या व्यतिरिक्त ती ‘चतुर चौकडी’ आणि ‘रुंजी’ या मराठी मालिकांमध्येही झळकली होती.

Leave a Comment