माझी ताकत- माझा पाठीराखा- माझा बापमाणूस; वडिलांच्या निधनानंतर अश्विनी महांगडेची भावुक पोस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक अत्यंत हतबल होऊन आपल्या प्रियजनांना गमवण्याचे दुःख पचवीत आहेत. या कोरोनाच्या महामारीत सिनेसृष्टीने अनेक हिरे गमावले. तर कित्येकांनी आपले प्रियजन. यात ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनघा अर्थात अभिनेत्री अश्विनी महांगडेचे वडिल डील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे कोरोनामूळे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून भोर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर अश्विनीने इंस्टाग्रामवर त्यांच्या आठवणीत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/CPDe587p1-e/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री अश्विनी महांगडेने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर वडिलांच्या आठवणीत एक पोस्ट लिहिली आहे. यात तिने म्हटले आहे की, कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला. कधी कधी स्वतःचे कपडे फाटलेले असले तरी शेवटपर्यंत लोकांसाठी करीत राहिले व मलाही तेच शिकवले. गेले १५ दिवस कोरोनाशी वाघासारखे लढले पण अखेरीस ही झुंज अपयशी ठरली. काळाने घाला घातला व आम्हाला पोरके केले. काल जाता जाता एक सांगून गेले की समाजासाठी काही केले नाही तर आपले आयुष्य निरर्थक. नाना..माझ्या यशाचं गुपित- माझे लढण्याचे बळ- माझे मार्गदर्शक- माझी ताकद- माझा पाठीराखा- माझा बापमाणूस.

https://www.instagram.com/p/CMw0ISmJEyV/?utm_source=ig_web_copy_link

कोरोनाच्या या महाभयंकर संकटात अश्विनी अनेक गरजूंच्या मदतीसाठी धावून आली आहे. तिने दोन वर्षांपूर्वी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानची स्थापना केली. या प्रतिष्ठानाअंतर्गत तिने अनेक लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली आहे. अश्विनीने साकारलेली स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील राणू आक्कासाहेब हि भूमिका अत्यंत गाजली. या भूमिकेतूनच ती लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचली. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अनघा नामक भूमिका साकारत आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेआधी अश्विनी महांगडे अस्मिता मालिकेत मनाली नामक भूमिकेत दिसली होती. याशिवाय तिने टपाल, बॉईज या चित्रपटातदेखील विविध भूमिकांमध्ये काम केले आहे.

Leave a Comment