रिंकू राजगुरूचा ‘नो मेकअप’ लूक पाहून चाहते झाले घायाळ; सोशल मीडियावर झाला कौतुकाचा वर्षाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचे फोटो आपल्या चाहत्यांसह शेअर करत असते. तिचे सोशल मीडियावर मोठ्या संख्येत फॅन फॉलोव्हिंग आहे. तिचे चाहते नेहमीच तिच्या विविध लूक आणि शेअर केलेल्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव करताना दिसतात. तिचा असाच एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. रिंकूचा हा नवा लूक चक्क विना मेकअप वाला आहे. मुख्य म्हणजे खरोखरच या फोटोत तिने मेकअप केलेला नाही मात्र नावापुरता लिपस्टिक तेवढी लावली आहे.

https://www.instagram.com/p/CPhu2J1pASw/?utm_source=ig_web_copy_link

 

रिंकू या फोटोत नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे. या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या फोटोचे वैशिष्ट्यच हे आहे कि रिंकूने यात मेकअप केलेला नाही. फक्त लिपस्टीकचा वापर केला आहे. विना मेकअप लूकमध्येही रिंकू तेवढीच सुंदर दिसते. या फोटोत ती अगदीच सिम्पल आणि सोबर साडीत दिसत आहे. या साडीत रिंकूचे सौंदर्य आणखीच खुलून गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे सिम्पल विथ नॅचरल ब्युटीचे हे प्रात्यक्षिकच म्हणावे लागेल. तसे रिंकूच्या सोशल मीडियावर नजर टाकाल तर तुम्हाला तिचे साडीमधील अनेक फोटो पाहायला मिळतील.

https://www.instagram.com/p/CO2RYhXp06P/?utm_source=ig_web_copy_link

 

अभिनेत्री रिंकू राजगुरूला साडी नेसायला फार आवडते हे तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरूनच स्पष्ट होते. त्यामुळे आवड म्हणून सवड मिळेल तेव्हा रिंकू सध्या सुध्या का असेना पण साड्यांमध्ये खास फोटोशूट करताना दिसते. मुख्य म्हणजे साडी नेसल्यावर तिच्या चेह-यावर कमालीचा आत्मविश्वास पाहायला मिळतो. गेल्या काही दिवसांत रिंकूने तिचे विनामेकअप लूकचं जास्त शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/CLeeRS_J6t6/?utm_source=ig_web_copy_link

तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर लवकरच छूमंतर या चित्रपटात रिंकू प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. तसेच रिंकू झुंड या हिंदी चित्रपटातदेखील दिसणार आहे. यात तिच्यासोबत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Leave a Comment