हैप्पी बर्थडे तेजस्विनी पंडित; अभिनयाचे बाळकडू घेतलेली एक बेधडक बिनधास्त अभिनेत्री

0
78
Tejaswini Pandit
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावासाठी संपूर्ण इंडस्ट्रीत ओळखली जाते. तेजस्विनी नाकाजवळ पाणी येण्याआधीच ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत असते. सुंदर अभिनय, मोहक अदा आणि निखळ सौंदर्यासहित लक्षवेधी स्टाईल यामुळे तेजस्विनीने रसिकप्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आज तेजस्विनीचा ३५वा वाढदिवस आहे. तेजस्विनीची आई देखील एक अभिनेत्री असल्यामुळे तिला लहानपणीच अभिनयाचे बाळकडू मिळाले होते. त्यामुळे सिने इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यानंतर अगदी अल्पावधीतच तिने प्रेक्षकांना भुरळ घातली.

https://www.instagram.com/p/CPMywLOM_b-/?utm_source=ig_web_copy_link

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हीचा जन्म २३ मे १९८६ रोजी पुण्यात झाला. तिचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यातच झाले आहे. ती व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉलची मोठी चाहती आहे. तेजस्विनीने काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘अगं बाई अरेच्छा’ या मराठी चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली होती.

https://www.instagram.com/p/B10TigmgBv-/?utm_source=ig_web_copy_link

तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर या मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये अत्यंत चुरशीच्या अश्या चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजस्विनीने सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि आज ती आघाडीच्या अभिनेत्रींनपैकी एक आहे.

https://www.instagram.com/p/B_NDrBgFN5q/?utm_source=ig_web_copy_link

मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे, ये रे ये रे पैसा, देवा अश्या अनेक चित्रपटांसह तिने अनेक नानाविविध नाटकं आणि १०० डेज सारखी दर्जेदार मालिका आणि समांतर सारख्या गूढ आणि खिलवणाऱ्या अश्या वेब सिरीज मधून तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

https://www.instagram.com/p/BuDQIhpBhQq/?utm_source=ig_web_copy_link

तिने प्रत्येक भूमिकेत अक्षरशः जीव ओतून काम केले आहे. तिने भूमिका उठविण्यासाठी घेतलेली मेहनत नेहमीच तिच्या अभिनयातून दिसून येते. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा तिने असा ठसा उमटवला आहे कि तिची दखल न घेणे म्हणजे अवघडच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here