‘पावनखिंड’ चित्रपटातून उलगडणार बाजीप्रभूंची शौर्यगाथा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंदेरी दुनिया । मराठेशाहीच्या इतिहासातील प्रत्येक पान अनेक शूर योद्ध्यांच्या पराक्रमाने सजलेलं आहे. हा सगळा इतिहास केवळ पुस्तकरूपात न राहता पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. लवकरच इतिहासातील आणखी एक सुवर्ण पान उलगडण्याची वेळ आली असून, पावनखिंड गाजवणाऱ्या बाजीप्रभूंची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी कायम तत्पर असणाऱ्या लढवय्या आणि पराक्रमी मावळ्यावर आधारित ‘पावनखिंड’ हा चित्रपट लवकर येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

तसेच, बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा सांगणारा ‘जंगजौहर’ या चित्रपटाची देखील पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली आहे. ‘आलमंड्स क्रिएशन्स’चे अजय-अनिरुद्ध आरेकर यांनी ‘जंगजौहर’ चित्रपटाच्या निर्मितीची अधिकृत घोषणा केली असून, जून २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment