कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. मराठी भाषा गौरव दिनाच्या मध्यवर्ती संकल्पनेत लोकसाहित्य उत्सव मराठीचा या अंतर्गत रघुनाथ साळोखे यांचा सोंगी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रस्तुतच्या भजनी मंडळ यांनी गण, जोतिबाची काठी आणि दत्त दर्शनाचा सोहळा या सोंगी भजनाच्या कार्याक्रमाचे सादरीकरण केले.
वर्तमानकालीन जीवनात यांत्रिक प्रसार माध्यमांमध्ये लोकसाहित्याचा ठेवा वृद्धिंगत व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी लोकसाहित्य आणि मराठी भाषा या विषयावर मौलिक विचार मांडले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने लोकभाषेचा गौरव करण्यासाठी म्हणी, वाक्प्रचार, उखाणे या अनुषंगाने भित्तीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत डॉ. पल्लवी कोडक यांनी केले. तर आभार डॉ. रचना माने यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन मानसिंगराव बोंद्रे, मानद सचिव विजयराव बोंद्रे, प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, डॉ. डी. के. वळवी, प्रबंधक आर. जे. भोसले, अधिक्षक एम. व्ही. भोसले यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.