हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची 395 वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन केले जात आहे. तसेच, त्यांच्या कार्याला सलाम करण्यात येत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अस्सल मराठमोळी भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्यासोबत, गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत.” तसेच, “छत्रपती शिवराय हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत.” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
दरम्यान, “हिंदवी स्वराज्याचा उद्घोष करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन नीती, कर्तव्य आणि धर्मपरायणता यांचा संगम होते. कट्टरपंथी आक्रमकांच्या विरुद्ध जीवनभर संघर्ष करून सनातन स्वाभिमानाचे धर्म ध्वज रक्षक छत्रपती शिवाजी महाराज एक राष्ट्रनिर्माता म्हणून सदैव स्मरणीय असतील. शिवजयंतीच्या निमित्ताने अद्वितीय साहसाचे प्रतीक, छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी नमन…,” असे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.
त्याचबरोबर, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरपूर्वक वंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आपला आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. छत्रपती शिवजी महाराज यांनी जीवन आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहील” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
https://x.com/RahulGandhi/status/1892048176799969723?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1892048176799969723%7Ctwgr%5E77032cd0ae7c5c4db2fd732bd1a24ca2e4a9bee7%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Findia%2Fshivjayanti-2025-narendra-modi-amit-shah-rahul-gandhi-have-posted-and-paid-tribute-to-chhatrapati-shivaji-maharaj-1345077