मराठवाडा गारठला ! औरंगाबाद @7.2 अंश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबाद शहर मराठवाड्याच्या काही शहरी भागात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. एमजीएम वेधशाळेत पहाटे किमान तापमान 7.2 अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले परभणीत 8 तर चिकलठाणा वेधशाळेत 8.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

औरंगाबाद शहरात रविवारी किमान तापमान 15.4 अंश सेल्सिअस होते. त्यात सातत्याने मोठी घसरण होत असून गुरुवारी 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यात 0.7 अंश सेल्सिअस ची घसरण होऊन काल चिकलठाणा वेधशाळेत 8.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सहा दिवसात तब्बल 7.3 अंश सेल्सिअस इतकी घसरण झाल्याने हुडहुडी भरवणाऱ्या बोचऱ्या थंडीला शहरवासीयांना सामोरे जावे लागत आहे. तर सकाळी आणि सायंकाळी शहरवासीयांना घराबाहेर पडणे ही अवघड बनले आहे.

परभणीत 8, हिंगोली 9 तर नांदेडमध्ये 9.8 अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. तसेच आगामी दोन ते तीन दिवस अशाच प्रकारे तापमान राहण्याची शक्यता असल्याचे एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले आहे.

Leave a Comment