मुंबई । शेअर बाजारातील टॉप टेन सर्वाधिक रेटिंग असलेल्या कंपन्यांपैकी आठ कंपन्यांनी गेल्या आठवड्यात मार्केटकॅपमध्ये 2,61,812.14 कोटी रुपयांचा एकत्रित तोटा नोंदवला. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केटकॅप सर्वाधिक घसरली.
टॉप दहा कंपन्यांच्या या लिस्टमध्ये फक्त इन्फोसिस आणि विप्रो नफ्यात राहिले. गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 1,774.93 अंकांनी किंवा 3.01 टक्क्यांनी घसरला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) व्हॅल्युएशन 79,658.02 कोटी रुपयांनी घसरून 15,83,118.61 कोटी रुपये झाले.
बँकिंग शेअर्सची मार्केट कॅप कमी झाली
HDFC ची मार्केटकॅप 34,690.09 कोटी रुपयांनी घसरून 4,73,922.86 कोटी रुपये झाली. बजाज फायनान्सची मार्केटकॅप 33,152.42 कोटींनी घसरून 4,16,594.78 कोटी रुपये आणि HDFC बँकेची मार्केटकॅप 27,298.3 कोटींनी घसरून 8,16,229.89 कोटी रुपये झाली.
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ची मार्केटकॅप 24,083.31 कोटी रुपयांनी घसरून 5,24,052.84 कोटी रुपये तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ची मार्केटकॅप 24,051.83 कोटी रुपयांनी घसरून 4,17,448.70 कोटी रुपये झाली.
टीसीएसची मार्केट कॅपही घसरली
ICICI बँकेची मार्केटकॅप 20,623.35 कोटी रुपयांनी घसरून 5,05,547.14 कोटी रुपये झाले आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची मार्केटकॅप 18,254.82 कोटी रुपयांनी घसरून 13,26,923.71 कोटी रुपये झाली.
याउलट, इन्फोसिसची मार्केटकॅप 26,515.92 कोटी रुपयांनी वाढून 7,66,123.04 कोटी रुपये आणि विप्रोची मार्केटकॅप17,450.39 कोटी रुपयांनी वाढून 3,67,126.39 कोटी रुपये झाली. या टॉप 10 कंपन्यांच्या क्रमवारीत RIL आघाडीवर होती. त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, एचयूएल, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स आणि नंतर विप्रो यांचा क्रमांक लागतो.