लठ्ठपणावरून होत असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

2
71
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी |लठ्ठपणाच्या कारणावरुन सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुळची फलटणची रहिवासी असलेली प्रियांका पेटकर हिचा चार वर्षांपूर्वी केदार पाटेकर याच्याशी विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून सासरच्या मंडळींकडून प्रियांकाला तू जाड आहेस, घटस्फोट घे, माहेरातून पैसे घेऊन ये अशा पद्धतीने त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून प्रियांकाने आत्महत्या केली. लठ्ठ असण्यावरून वारंवार टोमणे व दिल्या जाणाऱ्या त्रासाला कंटाळून प्रियांकाने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या भावाने केली आहे. यासंदर्भात भोसरी पोलिसांनी पती केदार पाटेकर आणि त्याच्या आई-वडिलांसह अन्य एकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here