हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Maruti : कोरोना नंतर जगभरातील बाजार आता खुले झाले आहेत. कोरोना काळात सर्वात जास्त नुकसान हे ऑटो इंडस्ट्रीला सोसावे लागले आहे. अशातच आता देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी सलेल्या मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेसाठी काही नवीन गाड्या घेऊन येणार आहे. अलीकडेच कंपनीने भारतात मारुती ब्रेझा लॉन्च केली आहे. यानंतर आता Maruti विटारा मिड-साइज एसयूव्ही देखील लॉन्च होणार आहे. 20 जुलै रोजी नंतर काही महिन्यांनी सणासुदीच्या काळात विटारा लॉन्च केली जाईल.
कंपनीकडून आगामी काळात भारतात एसयूव्हीचे अनेक नवीन मॉडेल्स लॉन्च केले जातील. एका ऑनलाइन मीडिया पब्लिकेशन्सशी बोलताना कंपनीचे सीनियर डायरेक्टर ऑफ मार्केटिंग अँड सेल्स शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले कि, कंपनीला जिमनी एसयूव्ही बाबत चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहे.
कंपनीने 2022 ऑटो एक्सपोमध्ये या कारचे 3-डोअर व्हर्जन लाँच केले होते. यानंतर आता कंपनी भारतात Maruti सुझुकी जिमनीचे 5-डोअर व्हर्जन आणण्यावर काम करत आहे. सध्या, Maruti या कारची किंमत, फीचर्स आणि लॉन्च करण्याच्या टाइमलाइनवर काम करत आहे.
Maruti च्या या शक्तिशाली एसयूव्हीमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन आणि AWD (ऑल व्हील ड्राइव्ह) सिस्टीम दिले जाऊ शकेल. यामध्ये इंधनाची कार्यक्षमता सुधारण्यासाठी माइल्ड हाइब्रिड टेक्नॉलॉजी वापरली जाऊ शकेल. ट्रान्समिशनच्याबाबत बोलायचे झाल्यास त्यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही पर्याय मिळतील.जानेवारी 2023 मधील ऑटो एक्सपोमध्ये ही कार लाँच केली जाऊ शकेल. या कारबाबत आतापर्यंत इतकीच माहिती समोर आली आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.marutisuzuki.com/
हे पण वाचा :
Credit Card चे पूर्ण लिमिट वापरत असाल तर आताच व्हा सावध… अन्यथा होऊ शकेल नुकसान !!!
Indian Railway : तत्काळ तिकीट बुकिंगद्वारे अशा प्रकारे मिळवा कन्फर्म सीट !!!
शेअर मार्केट मध्ये Pump and Dump द्वारे अशा प्रकारे केली जाते फसवणूक !!!
BSNL च्या ग्राहकांना धक्का ! कंपनीने ‘या’ 3 प्रीपेड प्लॅनमध्ये केला मोठा बदल