Maruti Suzuki Baleno Delta CNG : मारुतीची ‘ही’ CNG कार बाजारात घालणार धुमाकूळ; 31 किमीचे मायलेज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पेट्रोल (Maruti Suzuki Baleno Delta CNG) आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहकांचा कल हा CNG वाहनांकडे वळला आहे. एका पाठोपाठ एक CNG गाड्या बाजारात उतरत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मारुती सुजूकीने आपल्या Baleno चे CNG मॉडेल्स लाँच केले आहेत. मारुतीने आपले सीएनजी मॉडेल डेल्टा आणि झेटा या २ व्हेरिएन्ट मध्ये लॉन्च केले आहेत. आज आपण जाणून घेऊया Baleno Delta CNG चे खास फीचर्स आणि किंमत याबाबत…

Maruti Suzuki Baleno Delta CNG

फीचर्स –

मारुतीच्या डेल्टा CNG मध्ये (Maruti Suzuki Baleno Delta CNG) 7-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेला सपोर्ट करते. वरच्या बाजूला बेसिस मिरर मिळतो. या कारमध्ये सुरक्षेसाठी 6 एअरबॅग मानक म्हणून देण्यात आल्या आहेत. 6 एअरबॅग्ज मिळवणारी बलेनो ही त्याच्या सेगमेंटमधील एकमेव प्रीमियम हॅचबॅक आहे. गाडीच्या आकाराबाबत सांगायचं झाल्यास, या कारची लांबी 3990 mm, रुंदी 1745 mm, आणि उंची 1500 mm आहे. या गाडीला 2520 mm चा व्हील बेस देण्यात आला आहे. गाडीमध्ये बसण्यासाठी अतिशय चांगली आणि ऐसपैस जागा आहे. हाच या गाडीचा मोठा प्लस पॉइंट आहे.

Maruti Suzuki Baleno Delta CNG

मायलेज – (Maruti Suzuki Baleno Delta CNG)

गाडीच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, मारुतीच्या या कारला ४ सिलिंडर 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आहे. जे 6,000 rpm वर 76 BHP ची कमाल पॉवर आणि 4,300 rpm वर 98.5 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. बलेनोच्या CNG मॉडेलवर 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो . या कारला (Maruti Suzuki Baleno Delta CNG) ५५ लिटरचा CNG टॅंक मिळतो. ही गाडी CNG वर तब्बल 30.61 किलोमीटरचे मायलेज देते.

Maruti Suzuki Baleno Delta CNG

किंमत –

मारुती बलेनो सीएनजी डेल्टा एमटीची किंमत 8.28 लाख रुपये आहे. मारुतीची बलेनो ही कंपनीच्‍या प्रिमियम नेक्‍सा डीलरशिपवर सर्वाधिक विकली जाणारी प्रीमियम हॅचबॅक आहे.

हे पण वाचा : 

Tata Blackbird SUV : Tata Motors लॉन्च करणार ब्लॅकबर्ड SUV; Hyundai Creta ला देणार थेट टक्कर

Maruti Suzuki Cars : Maruti Suzuki च्या या गाड्यांवर बंपर डिस्काउंट; तुम्हीही घ्या फायदा

Honda Car : Honda च्या या गाड्यांवर 63,000 रुपयांपर्यंत बंपर सूट; तुम्हीही घ्या फायदा

Electric SUV : लवकरच बाजारात येणार देशी इलेक्ट्रिक SUV; एका चार्जवर 500 किमी धावणार

जगातील पहिली Solar- Electric कार लॉन्च; 700 किमी रेंज