Maruti Suzuki Car Discount : Maruti Suzuki च्या गाड्यांवर बंपर Discount; संधी सोडू नका

Maruti Suzuki Car Discount
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मार्च महिना सुरु झाला असून आर्थिक वर्षाचा हा शेवटचा महिना मानला जातो. त्यामुळे या महिण्यात आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी कार कंपन्यासुद्धा सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्याच पार्श्वभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki Car Discount) आपल्या सर्व गाड्यांवर बंपर सूट देण्यात आली आहे. ग्राहकांना याचा लाभ 31 मार्चपर्यंत घेता येणार आहे.

Maruti Suzuki Car Discount

1) WagonR वर 64 हजार रुपयांपर्यंत सूट

Maruti WagonR ही भारतात विकली जाणारी सर्वात यशस्वी कार आहे. या कारवर (Maruti Suzuki Car Discount) कंपनी 64 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. या ऑफर अंतर्गत, Maruti WagonR 1-लिटर LXI आणि VXI ट्रिम्स 40,000 रुपयांपर्यंत सूट देऊन खरेदी केले जाऊ शकतात. तसेच, एक्सचेंज ऑफर अंतर्गत, या दोन्ही मॉडेलवर अनुक्रमे 15,000 आणि 20,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त लाभ मिळेल. याशिवाय ग्राहकांना 4,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट सुद्धा मिळेल.

Maruti Suzuki Car Discount

2) Maruti Swift वर 54 हजारांची सूट- Maruti Suzuki Car Discount

मारुतीची स्विफ्ट ही एक अतिशय लोकप्रिय कार म्हणून ओळखली जाते. कंपनी या गाडीवर सुद्धा भरगोस सूट देत आहे. मारुती स्विफ्टच्या VXI, Z, आणि Z+ सारख्या टॉप मॉडेलवर 54 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळतेय. यामध्ये 30,000 रुपयांचा रोख डिस्काउंट, 4,000 रुपयांची एक्सचेंज सवलत आणि 20,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूटचा समावेश आहे.

Maruti Suzuki Car Discount

3) Maruti Alto 800 वर 38 हजारांची सूट

मारुती अल्टो 800 वर 38,000 रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. या सवलतीमध्ये 20,000 रुपयांची रोख सवलत, 15,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर आणि 3,000 रुपयांचाय कॉर्पोरेट सूटचा (Maruti Suzuki Car Discount) सुद्धा समावेश आहे.

Maruti Suzuki Car Discount

4) Maruti Suzuki Celerio वर 44,000 पर्यंत सूट

मारुती सुझुकी Celerio वर 44,000 रुपयांपर्यंत डिस्कॉउंट देत आहे. यामध्ये 25,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट आणि सुमारे 15,000 आणि 4,000 रुपये कॉर्पोरेट सूट देते. हा डिस्काउंट संपूर्ण मॅन्युअल श्रेणीवर उपलब्ध आहे. Celerio च्या ऑटोमॅटिक किंवा AMT एक्सचेंज पॉलिसीवर (Maruti Suzuki Car Discount) 15,000 रुपये आणि कॉर्पोरेट डीलवर रु. 4,000 पर्यंत सूट आहे. तर याच्या CNG व्हेरियन्ट वर 25,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

Maruti Suzuki Car Discount

5) Maruti Suzuki Dzire वर 10,000 रुपयांपर्यंत सूट

मारुती सुझुकी आपल्या डिझायर य सेडान कारवर 10 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे.