बच्चू कडूंच्या ‘ त्या’ वक्तव्यावरून आसामच्या विधानसभेत गदारोळ; अटकेची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या एका विधानामुळे आसामच्या विधानसभावनात विरोधकांनी गदारोळ केला. येव्हडच नव्हे तर बच्चू कडू याना अटक करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. अखेर यानंतर बच्चू कडू यांनी माफी मागितली आहे. चला जाणून घेऊया हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?

बच्चू कडू नेमकं काय म्हणाले होते ?

त्याच झालं असं की, आपल्या महाराष्ट्राच्या विधनभवनात बच्चू कडू यानी राज्यातल्या भटक्या कुत्र्यांसंदर्भात समिती गठित करण्यापेक्षा एखादा एक्शन प्लॅन तयार करा अशी मागणी करताना आसाममधील लोक कुत्र्याचं मटण खातात असं विधान केलं. महाराष्ट्रातले सर्व भटके कुत्रे आसाममध्ये पाठवा. तिथे त्यांना किंमत आहे कारण आपण जस इकडे बोकडाचे मटण खातो तस आसाममध्ये कुत्र्याचं मटण खातात असं बच्चू कडू यांनी म्हंटल होते.

त्यानंतर आसाम विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कडू यांच्या वक्तव्यावरून मोठा गोंधळ झाला. विरोधकांनी राज्यपालांना आपलं भाषण थांबवायला लावलं आणि आसामबाबत वादग्रस्त विधान करूनही सरकार यावर शांत का?” असा सवाल काँग्रेस आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ यांनी केला. तसेच बच्चू कडू याना अटक करावी अशी मागणी आमदारांनी केली.

अखेर बच्चू कडू यांचा माफिनामा –

दरम्यान, या एकूण सर्व प्रकरणानंतर बच्चू कडू यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. “मला आसाम नव्हे तर नागालँडचं नाव घ्यायचं होतं. मी ते चुकून आसाम बोललो. तरीही जर माझ्या वक्तव्यामुळे आसाममधील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो असं बच्चू कडू म्हणाले.