हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मधील 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स आज एकमेकांना भिडणार असून दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये जोरदार उत्सुकता आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा संघ यंदा जोरदार फार्मात आहे. चेन्नईने आत्तापर्यंत ६ सामन्यात तब्बल ५ वेळा विजय मिळवला असून गुणतालिकेत धोनीचा संघ अव्वल क्रमांकावर आहे
चेन्नईला प्रत्येक सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूंनी एकहाती सामना जिंकवून दिला आहे.चेन्नईचे सलामीवीर गायकवाड-प्लेसिस आणि मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना, मोईन अली , अंबाती रायडू सर्व चांगली कामगीरी करत आहे. तर अष्टपैलु रविंद्र जडेजा हा भन्नाट फार्मात आहे.
तर दुसरीकडे तब्बल ५ वेळा आयपीएल चषकवर आपलं नाव कोरणाऱ्या मुंबई इंडिअन्सची गाडी अजून पण म्हणावी तशी ट्रॅक वर आलेली नाही. आत्तापर्यंत मुंबईने ६ पैकी ३ सामने जिंकले अजून ३ वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. खराब फलंदाजी हि मुंबईच्या अपयशाचे खर कारण आहे. त्यामुळे आज बलाढ्य चेन्नईला हरवायचा असेल तर मुंबईला काहीही करून दमदार फलंदाजी करावीच लागेल. त्यासाठी कर्णधार रोहित शर्माला आज मोठी खेळीची आवश्यकता आहे. तर हार्दिक पंड्या , क्विंटॉन डी कॉक , कायरन पोलार्ड या आक्रमक फलंदाजांना वादळी खेळी करावी लागणार आहे. त्यामुळे आजच्या या महामुकाबल्यात नक्की कोण बाजी मारणार हे पाहण महत्त्वाचं आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.




