Maternity Insurance : मॅटर्निटी इन्शुरन्स म्हणजे काय? प्रसूतीसाठी 1 रुपयाही न भरता कसा मिळतो लाभ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Maternity Insurance) आजकाल कोणती समस्या कधी उद्भवेल काहीही सांगू शकत नाही. त्यात आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास ऐनवेळी हॉस्पिटल आणि दवाखाने पाठी लागतात. अशावेळी पैशांसाठी मोठी धावपळ लागते. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत नेमका किती पैसा लागेल याची काहीही शाश्वती नसते. अशावेळी आरोग्य विमा मोठी महत्वाची भूमिका पार पडतो. अचानक उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्येसाठी आरोग्य विमा मोठा फायदेशीर ठरतो. त्यामुळे बरेच लोक आरोग्य विमा आवर्जून काढतात.

अनेक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आकर्षक आरोग्य विमा योजना राबविल्या जातात. ज्यांचा ग्राहकांना खरोखरच फायदा होतो. माहितीनुसार, आरोग्य विमा देणाऱ्या एकूण ५७ कंपन्या आहेत. ज्या प्रसूती काळात फायदेशीर ठरणारा मॅटर्निटी इन्शुरन्स (Maternity Insurance) देतात. आता हा नेमका कोणत्या प्रकारचा विमा आहे? आणि याचा लाभ कसा मिळतो? याविषयी फार कमी लोकांना माहित आहे. म्हणूनच आज आपण मॅटर्निटी इन्शुरन्सविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

मॅटर्निटी इन्शुरन्स म्हणजे काय? (Maternity Insurance)

मॅटर्निटी इन्शुरन्स म्हणजे ‘मातृत्व विमा’. हा एक आरोग्य विम्याचा प्रकार आहे. हा विमा अनेक आरोग्य विमा देणाऱ्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून दिला जातो. जो महिलांच्या प्रसुतीच्या अगोदरचा आणि प्रसूतीनंतरचा खर्च काढण्यासाठी मदत करतो. काही कार्पोरेट कंपन्यासुद्धा आरोग्य विमा योजनांमधून महिला कर्मचाऱ्यांच्या प्रसूती काळातील खर्चासाठी हा विमा प्रदान करतात. हा विमा एक ॲड ऑन इन्शुरन्स असतो. ज्याला तुम्ही सामान्य आरोग्य विम्यासोबतसुद्धा घेऊ शकता.

मॅटर्निटी इन्शुरन्सचे फायदे

महिलांच्या प्रसूती कालावधीतील खर्चासाठी हा विमा अत्यंत फायदेशीर ठरतो. प्रसूती कालावधीत येणारा खर्च वाचावा म्हणून हा ऍड ऑन इन्शुरन्स घेतला जातो. या विमा योजनेच्या माध्यमातून विमा देणारी कंपनी हॉस्पिटलची फी, वंध्यत्व उपचार, लसीकरण आणि काही प्रसंगी मूल दत्तक घेण्यासाठीचा खर्चसुद्धा उचलते.

इतकंच नाही तर, मॅटर्निटी इन्शुरन्स या विम्याच्या प्रकारात सरोगसीचा खर्चसुद्धा मिळतो. (Maternity Insurance)

याआधी कुठल्याही प्रकारचा आरोग्य विमा घेतल्यास तुम्हाला मॅटर्निटी इन्शुरन्सच्या कव्हरेजसाठी २ ते ४ वर्षाचा वेटिंग पिरियड दिला जात होता. मात्र, आता हा कालावधी ९ महिन्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या अंतर्गत महिलेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर कॅशलेस उपचार दिले जातात.

या विम्यामुळे आता कोणत्याही महिलेला प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता रोकड देण्याची गरज भासत नाही. (Maternity Insurance) यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये गेल्यावर विमा कंपनीला विम्याची माहिती द्यावी लागते. शिवाय आवश्यक ती कागदपत्रे जमा करावी लागतात. असे केल्यास प्रसूती कालावधीतील सर्व उपचार कॅशलेस स्वरूपात होतात.

मॅटर्निटी इन्शुरन्सच्या माध्यमातून नवजात बालकाच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून ते बाळ ९० दिवसाचे होईपर्यंत त्याचा सर्व खर्च केला जातो. (Maternity Insurance)