सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
सातारा शहर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार इनायत मोहम्मदअली शेख (वय- 47 वर्षे रा. 635 गुरुवारपेठ, सातारा) हा अवैद्य मटका व्यवसाय करणारा गुन्हेगार असून त्याचेवर शाहुपुरी पोलीस स्टेशनला अवैद्य जुगाराचे गुन्हे दाखल आहेत. तडीपाल आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
इनायत शेख याला पोलीस अधिक्षक अजय बन्संल यांनी दिनांक 15 मार्चपासून सहा महीने कालावधीसाठी सातारा जिल्हयातुन तडीपार करण्यात आले आहे. आज दि. 23 मार्च रोजी गुप्त माहिती मिळालेने सदरचा गुंड हा सातारा शहरात आला आहे. त्यास पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्संल,अपर पोलीस अधिक्षक अजय बो-हाडे, सहा पोलीस अधिक्षक आंचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, पो. ना अभय साबळे, पो. ना. गणेश ताटे या टीमने ताब्यात घेवून अटक करणेत आली आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
जे गुन्हेगार तडीपार करणेत आले आहेत. ते जर सातारा शहरात परत आलेस त्याचेवर गुन्हा दाखल करून अटक करून जेलमध्ये टाकणेत येईल. सातारा शहर पोलीस स्टेशन कडून विकास मुरलीधर मुळे (रा. पॉवर हाऊस, झोपडपट्टी सातारा), प्रल्हाद रमेश पवार (रा. मानस हॉटेल मागे, सातारा), सुरज राजु माने (रा. लक्ष्मीटेकडी, सदरबझार सातारा), तेजस संतोष शिवपालक (रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार सातारा), प्रमोद ऊर्फ बाळा काशीनाथ सगट (रा. प्रतापसिंहनगर, खेड, सातारा) यांना तडीपार करण्यात आले आले आहेत. सर्व नागरिकांना आवाहन आहे, की वरील तडीपार गुंड आपणाला दिसून आलेस तर आपण सातारा शहर पोलीस स्टेशन फोन नं. ०२१६२-२३०५८० यावर माहीती दयावी.