Thursday, October 6, 2022

Buy now

तोल गेल्यामुळे कंटेनरच्या धडकेत दोन बाइकस्वारांचा जागीच मृत्यू

वसई : हॅलो महाराष्ट्र – आजकाल रोड अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे हे अपघात रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. अशातच वसईमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता कि हा अपघात किती भयंकर होता ते. मुंबई अहमदाबाद मार्गावर हा अपघात झाला. या अपघातात बाईकवरुन जाणाऱ्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी बाईकवरुन जाणाऱ्या दोघांनीही हेल्मेट घातलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या आरोपी कंटेनर चालकाला अटक केली आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावीरल पेल्हार फाटा इथं हा अपघात घडला होता. दुचाकीवरुन दोघं जणं जात होती. त्यावेळी त्यांच्या मागून भरधाव वेगाने एक कंटेनर येत होता. याचदरम्यान अचानक दुचाकीस्वारांचा तोल गेला आणि बाईकवरील दोघंही या कंटेनर खाली येऊन चिरडले गेले. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, सर्विस रोडवरुन एक टेम्पो हायवेवर येत असतो. बाईक डाव्या बाजूनं टेम्पो रस्त्यावर येतोय पाहून उजव्या बाजूला सरकताना दिसून आली आहे. दरम्यान, याच वेळी अचानक बाईकचालकाचा तोल जातो आणि बाईक घसरून हे दोघे कंटेनरच्या खाली येतात. याचदरम्यान कंटेनर त्यांच्या डोक्यावरून जाऊन त्यांचा जागीच मृत्यू होतो. हा अपघात किती भयंकर होता ते या व्हिडिओमधून दिसत आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.