पुणे | समाजामध्ये दिवसेंदिवस होणाऱ्या बाल लैंगिक मानसिक शारीरिक शोषणाचे प्रमाण वाढले असून त्याविरुद्ध आवाज अभावनेच उठविले जाते, बाल वयापासून या प्रवृत्ती मुळे बालकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार होते व खच्चीकरण होते, ज्याचा परिणाम त्यांच्यावरच नव्हे तर संपूर्ण समाजावर देशावर होतो, देशाचा मुख्य घटक व उद्याचे भविष्य म्हणून आपण यांच्याकडे पाहतो, त्यांच्या शोषणा विरुद्ध आवाज उठवण्यासाठी मातोश्री स्कूल ने दिनांक १९/८/२०१८ रोजी स्कूलपासुन ते डॉ आंबेडकर चौकापर्यंत रेलीचे आयोजन केले आहे, यात बालक सहभागी होणार नसुन पालक व सर्वसमावेशक समाजाला जागृत करण्यासाठी यात सहभागी होण्याचे आवाहन मातोश्री नेशनल स्कूल चे प्रमुख मनीषा काशिद यांनी केले,
शोषण व शोषणाचे प्रकार
शोषण हे भावनिक, लैंगिक, शारीरिक, मानसिक, स्वरुपात असू शकते, शोषण कौंटुंबिक व्यक्तिंकडुन सुद्धा होउ शकते, या पूर्वीही असे अनेक प्रकार उघड़ीस आले आहेत.
१) शरीरिक बालशोषण
२) लैंगिक बालशोषण
३) मानसिक बालशोषण
४) बालकामगार शोषण