सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे,
सांगली महानगरपालिकेच्या महापौर संगीता खोत यांना अतिउत्साह नडला आहे. अंगावर कमळ चिन्ह असलेली साडी परिधानकरून मतदान करण्यासाठी जाण चांगलच महागात पडलं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापौरांविरोधात मिरज गांधीनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर महापौरांवर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात निवडणुक सुरू असताना सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या महापौर संगीता खोत यांनी अंगावर कमळ चिन्ह असलेली साडी परिधान करून माणिकनगर येथील मतदान केंद्रामध्ये गेल्या होत्या. भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला म्हणून यांच्यावर गांधी चौकी पोलिसात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. महापौर संगीता खोत या माणणिकनगर मध्ये एका मतदान केंद्रावर कमळ चिन्ह असलेली साडीपरिधान करून गेल्या होत्या. भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हा त्यांनी प्रचार केला म्हणून अचारसंहिता फिरत्या पथकांनी महापौर संगीता खोत यांच्यावर गांधी चौकी पोलिसात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
तत्पूर्वी अय्याज नायकवडी यांनी कमळ चिन्ह असलेली साडी परिधान करून पक्षाचा प्रचार करीत असल्याचा आक्षेप घेतला होता. त्यावर अय्याज नायकवडी व महापौर संगीता खोत यांच्यामध्ये वादावादी झाली. अय्याज नायकवडी यांनी निवडणूरक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. अचारसंहिता विभागाच्या फिरत्या पथकानी महापौर संगीता खोत यांच्यावर गांधी चौकी पोलिसात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.