हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एखाद्या हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर गेल्यानंतर खवय्यांचे लक्ष असते ते म्हणजे तिथे मिळणाऱ्या जेवणाच्या थाळीवर. अशा सर्व खवय्यांसाठीच एक आनंदाची बातमी आली आहे. जानेवारी महिन्यापासून जेवणाची थाळी स्वस्त झाली आहे. बुधवारी क्रेडिट रेटिंग एजन्सीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जानेवारीमध्ये सर्वसामान्यांसाठी व्हेज खायची किंमत 28 रुपयांपर्यंत खाली घसरली आहे.
व्हेज थाळी झाली स्वस्त (Veg Thali)
गेल्या महिन्याभरापूर्वीच म्हणजेच डिसेंबरमध्ये व्हेज जेवणाची थाळी 29.7 रुपये इतकी होती. तर एका वर्षापूर्वी जानेवारी महिन्यामध्ये व्हेज जेवणाची थाळी 26.6 रुपये इतकी होती. त्यानंतर आता जानेवारी 2024 वर्षांमध्ये पुन्हा एकदा जेवणाच्या थाळीच्या किमती कमी झाल्या आहेत. व्हेज थाळी आता आपल्याला 28 रुपयांनी स्वस्त बसले. खरे तर बाजारामध्ये पालेभाज्यांच्या आणि स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गोष्टींच्या किमती कमी झाल्यामुळे दुसऱ्या बाजूला जेवणाच्या थाळीच्या किमती देखील घसरल्या आहेत.
नॉनव्हेज थाळीच्या किमती घसरल्या (Non-Vag Thali)
नवीन वर्षामध्ये मांसाहारी थाळीच्या किमतीत देखील कमी झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात मांसाहारी थाळीची किंमत
52 रुपये होती. हीच किंमत डिसेंबर 2023 महिन्यामध्ये 56.4 रुपये होती. एका वर्षापूर्वी नॉनव्हेज थाळीची किंमत 59 रुपये होती. त्या मानाने या जानेवारी महिन्यात नॉनव्हेज थाळीच्या किमती घसरलेल्या दिसत आहेत. याचा फायदा खवई मंडळींना सर्वात जास्त होणार आहे. मुख्य म्हणजे जानेवारी महिन्यात कांदा आणि टोमॅटोच्या भावात देखील घसरण झाली होती. त्यामुळेच दुसऱ्या बाजूला नॉनव्हेज थाळीच्या किमती घसरल्या.