शाहिद कपूरच्या पत्नीला पडलाय प्रश्न.. विचारतेय ‘सगळे पुरुष एकसारखेच असतात?’; फोटो झाला वायरल

0
61
Shahid Kapoor_With Wife
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची बायको म्हणजेच मीरा राजपूत हि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. शाहिदची बायको जरी अभिनेत्री नसली तरी तिचे फॉलोवर्स सेलेब्रिटी सारखेच आहेत. नुकताच एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनने नव्या चर्चेला उधाण आणले आहे. शेअर केलेल्या फोटोत शूज आणि सॉक्स घरात अस्तव्यस्त फेकल्याचे पाहायला मिळत आहेत. हा फोटो शेअर करुन तिने फोटोला कॅप्शन देत ती म्हणतेय सगळे पुरुष सारखेच असतात.

तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओवर तिचे चाहते कायम लक्ष ठेवून असतात. इतकेच नव्हे तर तिला समीक्षा देत कौतुकही करतात. बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच मीरा देखील आलिशान आयुष्य जगते. अर्थातच शाहिदची पत्नी म्हणून तिचा अनोखाच थाट आहे. मीराने पोस्ट केलेल्या या फोटोपेक्षा कॅप्शननेच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तुर्तास या फोटोच्या माध्यमातून ‘सगळे पुरूष एकसारखेचं असतात?’ असा प्रश्न मीराने उपस्थितीत केला आहे. शाहीद घरात कसा राहतो. हेच सांगण्याचा प्रयत्न बहुतेक मीरा या फोटोतून करत आहे.

https://www.instagram.com/p/CNAD0kelmtR/?utm_source=ig_web_copy_link

शाहिद आपल्या व्यस्त शेड्युलमुळे बहुतेकदा घराबाहेर असतो. मात्र कामातून वेळ मिळताच कुटुंबासोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतो. सध्या लॉकडाऊन आहे आणि यामुळे चित्रपटांचे शूटिंगही बंद आहेत. त्यामुळे घरातच बंदिस्त होत कलाकार मंडळी वेगवेगळ्या गोष्टीत आपापले मन रमवत काही ना काही करताना दिसत आहे. आजपर्यंत समोर आलेल्या फोटोत शाहिद काही ना काही तरी करताना दिसत होता. मात्र या फोटोमुळे ”जसं दिसतं, तसं नसतं” हेच सांगण्याचा मीराने एक यशस्वी प्रयत्न केला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here