सातारा जिल्ह्यातील बाधित कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणेबाबत बैठक संपन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | गेल्या आठ दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत तसेच बाधित कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणेबाबत व त्यांच्या अडचणी सोडवणेबाबत चर्चा झाली. सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टी व भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, तात्पुरत्या – कायमस्वरूपी उपाययोजना व पुनर्वसन या अनुषंगाने राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, विधानपरिषद सदस्य शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी श्री रामचंद्र शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. धोत्रे, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम श्री मुनगिलवार, अधीक्षक अभियंता महावितरण श्री गायकवाड, अधीक्षक अभियंता सिंचन श्री डोईफोडे व श्री मिसाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते तसेच इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात पाटण, जावली, वाई व महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. सातरा जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना पूराच्या पाण्याचा फटकाही बसलेला आहे. जिल्ह्यातील अनेक रस्ते वाहून तसेच तडे गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तेव्हा या सर्वांचा पंचनामा व पाहणी करून अहवाल तयार करण्यात यावा, अशाही सूचना लोकप्रतिनिधींनी केल्या आहेत.

Leave a Comment