हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्वाचा मुद्दा असलेल्या काश्मीरचा मुद्दा हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिलेला आहे. त्यामुद्यांवरून राजकीय लोकांच्यामध्ये नेहमी वाद झाल्याचे पहायला मिळालेला आहे. मध्यतंरी आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनीही काश्मीरच्या मुद्यावर वक्तव्य केले होते. त्यांच्यानंतर आता मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. “जम्मू-काश्मीर गांधींचे जम्मू- काश्मीर होते, मात्र आता मोदी सरकारने ते तसे ठेवले नाही. त्यांनी भारत गांधींचा ठेवला नाही, हा नवा भारत गोडसेंचा भारत बनवला आहे. तसेच त्यांनी काश्मीरचे मोठे नुकसान केल्याचा आरोप मुफ्ती यांनी केला आहे.
मेहबुबा मुफ्ती यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मोदी सरकारमुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वातंत्र्यावेळी आजच्यासारखे सरकार असते तर जम्मू-काश्मीर भारतात नसते. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे काम केले. मात्र, मोदी सरकारने कलम 370 हटवून काश्मीरचे मोथे नुकसान केले आहे. आणि मोदी सरकार नवे काश्मीर बनवल्याचा दावा करत आहे, असेही मुफ्ती यांनी यावेळी सांगितले.
भाजपवर टीका करताना मुक्ती म्हणाल्या की, भाजप सरकारने भारत गांधींचा ठेवला नाही, हा नवा भारत गोडसेंचा भारत बनवला आहे, लोकांना त्यांच्या जमिनी जाण्याची भिती वाटू लागली, लोकांना त्यांच्या नोकऱ्या जायच्या भीती वाटू लागली आहे. राजकारणासाठी भाजप काहीही करू शकते, भाजप काश्मीर गमावू शकते, शेतकऱ्यांवर गाडी चालवू शकते, अशी त्यांनी सांगितले.