आता रेशन कार्डसोबत बाळगण्याची गरज नाही; अशाप्रकारे तयार करा डिजिटल कार्ड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकारने देशातील नागरिकांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत. त्यातील रेशन कार्ड योजना ही एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत शिधापत्रिका धारकांना कमी दरात किंवा अगदी मोफत देखील रेशन दिले जाते. अनेक वेळा गडबडीत आपण रेशन कार्ड घरी विसरतो. त्यामुळे आपल्याला रेशन मिळत नाही. परंतु यासाठी एक नवीन प्रणाली विकसित झालेली आहे. आता तुम्ही तुमचे रेशन कार्ड बाळगण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील हे काम करू शकता. सरकारने मेरा राशन 2.0 हे मोबाईल ॲप लॉन्च केलेले आहे . ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्डचा वापर करू शकता.

मेरा राशन 2.0 एप्लीकेशन तुम्हाला डिजिटल रेशन कार्डचा पर्याय देखील देणार आहे. त्यामुळे तुम्हाला दरवेळेस रेशन कार्ड सोबत घेऊन जायचे नाही. तुम्ही तुमचे डिजिटल रेशन कार्ड काढू शकता. यामुळे तुमचे काम होईल. तुमच्याकडे जर रेशन कार्ड नसेल, तर ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बनवू शकता. आता ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड बनवण्यासाठी कोणत्या पात्र लागतात. हे आपण जाणून घेऊया.

मेरा रेशन 2.0 ॲप

  • मेरा रेशन 2.0 हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरवर जाऊन हे ॲप डाऊनलोड करू शकता.
  • इन्स्टॉल झाल्यानंतर त्यावर तुम्ही तुमचा आधार क्रमांक,मोबाईल नंबर या सगळ्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी भरा
  • त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल तो ओटीपी एंटर करा.
  • मग तुम्हाला शिधापत्रिकेची डिजिटल प्रत मिळेल.

शिधापत्रिकेसाठी आवश्यकता

  • शिधापत्रिकेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
  • कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न हे 5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.
  • कुटुंबाकडे कार किंवा इतर चार चाकी वाहन नसावे.
  • पेन्शन मिळत असेल तर ती 10 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावी